चित्रपटगृहांचा पडदा उघडणार सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्येच; आसनव्यवस्थेत होणार बदल

राज्यातील सर्व चित्रपटगृहे बंद करण्याचा निर्णय सरकारने 13 मार्चला घेतला आणि 14 मार्चला त्याची अंमलबजावणी झाली. त्यापाठोपाठ चित्रीकरण बंद करण्यात आले. देशातील सर्व चित्रपटगृहे 22 मार्चला बंद करण्यात आली. चित्रपटगृहे लवकर सुरू होण्याची शक्‍यता नाही. मनोरंजन क्षेत्र अत्यावश्‍यक सेवेत येत नसल्यामुळे सरकार चित्रपटगृहे सुरू करण्यास प्राधान्य देणार नाही
Cinema Theaters May open in Speptember or October
Cinema Theaters May open in Speptember or October

मुंबई : राज्यातील सर्व चित्रपटगृहे बंद होऊन तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. बंद चित्रपटगृहांचा पडदा कधी उघडेल हे कुणीही सांगू शकत नाही. कोरोनाचा कहर अजूनही ओसरला नाही आणि लॉकडाऊनही संपलेले नाही. चित्रपटसृष्टीतील जाणकारांच्या मते सप्टेंबर किंवा ऑक्‍टोबरमध्ये चित्रपटगृहे सुरू होतील. त्यासाठी सरकारच्या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असेल, परंतु चित्रपट पाहण्यासाठी किती प्रेक्षक येतील हा प्रश्‍नच आहे.

राज्यातील सर्व चित्रपटगृहे बंद करण्याचा निर्णय सरकारने 13 मार्चला घेतला आणि 14 मार्चला त्याची अंमलबजावणी झाली. त्यापाठोपाठ चित्रीकरण बंद करण्यात आले. देशातील सर्व चित्रपटगृहे 22 मार्चला बंद करण्यात आली. चित्रपटगृहे लवकर सुरू होण्याची शक्‍यता नाही. मनोरंजन क्षेत्र अत्यावश्‍यक सेवेत येत नसल्यामुळे सरकार चित्रपटगृहे सुरू करण्यास प्राधान्य देणार नाही. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सरकार परवानगी देईल आणि सगळ्यात शेवटी चित्रपटगृहे सुरू होतील.

प्रेक्षकांना मास्क घालूनच प्रवेश

चित्रपटगृहे सुरू करताना फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळावा लागेल. दोन आसने सोडून एक तिकीट देणे, एक खेळ संपला, की दुसरा खेळ सुरू करण्यापूर्वी चित्रपटगृहाचे निर्जंतुकीकरण करणे, प्रेक्षकांना मास्क घालूनच प्रवेश देणे असे नियम असू शकतील, असे जाणकारांनी सांगितले.

सरकार अधिक काळ चित्रपटगृहे बंद ठेवेल असे वाटत नाही. चित्रपटगृहे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुरू होतील. वितरकांनी चित्रपट दिल्यानंतरच ते प्रदर्शित करण्यात येतील. सध्या आम्ही साफसफाई, प्रेक्षकांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची याचा विचार करत आहोत. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच चित्रपट दाखवावा लागेल. - मोहन उमरोटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्निव्हल सिनेमा

सप्टेंबरमध्ये चित्रपटगृहे सुरू होतील, पण प्रेक्षक किती येतील हा प्रश्‍न आहे. कारण लोकांच्या मनात भीती आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्ववत होण्यास मोठा कालावधी लागणार आहे.- नानूभाई जयसिंघानी, चित्रपट निर्माते

दिवाळीपूर्वी चित्रपटगृहे सुरू होतील हे नक्की. काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. कारण आधी आरोग्य महत्त्वाचे आणि मनोरंजन नंतर. त्यामुळे सरकार लवकर निर्णय घेणार नाही. कोरोनाची स्थिती पाहता चार महिने तरी पडदा उघडणार नाही. - मंगेश कुलकर्णी, बिझनेस हेड, झी स्टुडिओ

चित्रपटगृहे सप्टेंबरपूर्वी सुरू होणार नाहीत. वातावरण चांगले असेल तरच प्रेक्षक येतील. संपूर्ण परिस्थिती निवळल्यानंतरच चित्रपटगृहे सुरू होतील. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे असेल. वातावरण पूर्ववत झाल्यानंतरच मोठे हिंदी चित्रपट प्रदर्शित होतील. - प्रकाश चाफळकर, सचिव, मल्टिप्लेक्‍स असोसिएशन
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com