Akshay Kumar Donated Smart Wathches to Mumbai Police | Sarkarnama

अक्षयकुमारने दिली मुंबई पोलिस दलाला स्मार्टवॉचेसची भेट

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 ऑगस्ट 2020

कोरोना महामारीमध्ये अनेक कलाकार आपापल्या परीने मदत करीत आहेत. दिग्दर्शक रोहित शेट्टीने पोलिसांना आराम करण्यासाठी हॉटेल्समधील काही खोल्या दिल्या. अक्षयकुमारने नाशिक पोलिसांना एकदा स्मार्टवॉच आणि नंतर पुन्हा रिस्ट बेल्ट मदत म्हणून दिले. आता अक्षयने मुंबई पोलिसांनाही स्मार्टवॉच भेट म्हणून दिले

मुंबई : अभिनेता अक्षयकुमार नेहमीच अडीअडचणीच्या वेळी मदतीला धावून येत असतो. कोरोना महामारीमध्येही त्याने मदतीचा हात दिला आहे. पंतप्रधान सहायता निधीसाठी तसेच मुख्यमंत्री फंडासाठी यापूर्वी त्याने मदत केली आहे. गेल्या सुमारे चार महिन्यांपासून आपले पोलिस या कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपला जीव धोक्‍यात घालून महत्त्वाची भूमिका बजावीत आहेत. अक्षयने यापूर्वी नाशिक पोलिसांना दोन वेळा मदत केली आहे आणि आता मुंबई पोलिसांना त्याने स्मार्टवॉचची भेट दिली आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे त्याने ही मदत सुपूर्द केली. त्या वेळी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

कोरोना महामारीमध्ये अनेक कलाकार आपापल्या परीने मदत करीत आहेत. दिग्दर्शक रोहित शेट्टीने पोलिसांना आराम करण्यासाठी हॉटेल्समधील काही खोल्या दिल्या. अक्षयकुमारने नाशिक पोलिसांना एकदा स्मार्टवॉच आणि नंतर पुन्हा रिस्ट बेल्ट मदत म्हणून दिले. आता अक्षयने मुंबई पोलिसांनाही स्मार्टवॉच भेट म्हणून दिले. हे स्मार्टवॉच घातल्यानंतर पोलिसांच्या शरीराचे तापमान, हृदयाची गती आणि रक्तदाब यांचे निरीक्षण करता येणार आहे. 

तसेच त्यांना ताप आल्यास त्यांना इशाराही मिळणार आहे जेणेकरून पोलिसांना सतर्क राहता येईल. या स्मार्टवॉचमध्ये पल्स मीटर आणि ऑक्‍सिमीटरदेखील आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी एखाद्या पोलिसाला अस्वस्थ वाटत असेल, तर ते सूचित करेल. अक्षयने केलेल्या मदतीविषयी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी टविट्‍रवरून माहिती दिली.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख