सर्वात चांगली कामगीरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे 

देशातील सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाचवा क्रमांक मिळाला आहे. पहिल्या पाचमध्ये भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्यांचा समावेश नाही.
Uddhav Thackerayjpg
Uddhav Thackerayjpg

नवी दिल्ली : देशातील सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाचवा क्रमांक मिळाला आहे. पहिल्या पाचमध्ये भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्यांचा समावेश नाही. एबीपी न्यूज आणि सी-व्होटरने याबाबत सर्वेक्षण केलं होतं. याद्वारे त्यांनी देशातील नागरिकांची मते जाणून घेतली.   

या सर्वेक्षणानुसार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तिसऱ्या स्थानी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, चौथ्या स्थानी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि पाचव्या स्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत.

या यादीत उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना त्यांच्याच राज्यातील जनतेने कमी पसंती दर्शवली आहे.  त्यामुळे या तिन्ही मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात घटली आहे. 

उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि बिहारसहित तीन मोठ्या भाजपची सत्ता असलेल्या राज्यांची सरासरी लोकप्रियता राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राष्ट्रीय लोकप्रियतेच्या सरासरीपेक्षा अधिक चांगलं काम करत आहेत.

दरम्यान, पाच सर्वाधिक खराब कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपचे दोन मुख्यमंत्री आहेत तर भाजपचा पाठिंबा असलेल्या एका मुख्ममंत्र्याचा समावेश आहे. म्हणजेच खराब कामगिरी करणाऱ्या पाचपैकी तीन मुख्यमंत्री भाजपचे आहेत. तामिळनाडूत पलानीस्वामींना भाजपचा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे. या सर्वेक्षणात देशातील ३१ मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रीयतेचा कल जाणून घेण्यात आला आहे. हे सर्वेक्षण देशातील ५४३ लोकसभा क्षेत्रात करण्यात आले आहे. यामध्ये ३० हजार जाणांनी सहभाग नोंदवला आहे.  

चांगली कामगिरी करणारे मुख्यमंत्री

नवीन पटनायक (ओडिशा)
अरविंद केजरीवाल (दिल्ली)
जगनमोहन रेड्डी (आंध्र प्रदेश)
पी. विजयन (केरळ)
उद्धव ठाकरे (महाराष्ट्र)
भूपेश बघेल (छत्तीसगड)
ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल)
शिवराजसिंह चौहान (मध्य प्रदेश)
प्रमोद सावंत (गोवा)
विजय रुपाणी (गुजरात)

खराब कामगिरी करणारे मुख्यमंत्री

त्रिवेंद्रसिंह रावत (उत्तराखंड)
मनोहरलाल खट्टर (हरयाणा)
कॅप्टन अमरिंदर सिंह (पंजाब)
के. चंद्रशेखर राव (तेलंगाणा)
के. पलानीस्वामी (तामिळनाडू)


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com