मुंबई : आपल्या वादग्रस्त विधानामुळे नियमीत चर्चेत असणाऱ्या कंगनावर टि्वटरने तात्पुरते निर्बंध घातले आहेत. ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करुन वारंवार वादग्रस्त विधानं करत असल्यामुळे कंगनावर ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे चिडलेल्या कंगनाने थेट धमकीच दिली असून तिच्याविरोधात भूमिका घेणाऱ्यांना तुमचं जगणं अवघड करणार असल्याचं तिनं म्हटलं आहे.
ट्विटरने सध्या आपल्या धोरणांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेते झालेल्या हिंसाचारानंतर ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंटही बंद केले होते. तीच वेळ ट्विटरवरुन वारंवार वादग्रस्त विधानं करणाऱ्या कंगनावर ओढवली आहे. ट्विटरने तात्पुरते निर्बंध आणल्यानंतर कंगनाने ट्विटरचे सीईओ जॅक डोर्से यांच्यावरच निशाना साधला आहे.
कंगनानं ट्विटरवर म्हणटल की, “लिबरल लोक आपले काका जॅक यांच्याकडे जाऊन रडत आहेत आणि माझ्या अकाउंटवर काही काळासाठी निर्बंध आणले आहेत. ते मला धमक्याही देत आहेत. ट्विटरवरच अकाउंट म्हणजेच माझी व्हर्चुअल ओळख देशासाठी शहीद होऊ शकते. मात्र, माझं रिलोडेड देशभक्तीचं व्हर्जन सिनेमांद्वारे पुन्हा पुन्हा परत येईल. याद्वारे ‘तुमचं जगणंच मी अवघड बनवून ठेवेल'”
कंगनाने नुकतेच तिच्या नव्या सिनेमाची घोषणा केली. या चित्रपटाचं नाव ‘मणिकर्णिका रिटर्न्स : दि लिजेंड ऑफ दिद्दा’ असं आहे. घोषणेपासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एका लेखकाने चित्रपट निर्माते आणि कंगनावर आपलं पुस्तक ‘दिद्दा : द वॉरियर क्वीन ऑफ काश्मीर’ या पुस्तकावरुन कथा चोरल्याचा आरोप केला आहे.
Edited By - Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.