स्वतःची विवेकबुद्धी विकू नका : जे. एफ. रिबेरोंची 'आयपीएस'अधिकाऱ्यांना कळकळीची विनंती

सध्या ९१ वर्षांचे असलेले रिबेरो महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी होते. महाराष्ट्रसह, गुजरात आणि पंजाबमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले. विशेषतः पंजाबमध्ये खलिस्तानी चळवळ ऐन भरात असताना रिबेरो तिथे महासंचालक होते. त्यांनी अतिरेकी कारवाया थंड करण्यासाठी राबवलेल्या 'बुलेट फाॅर बुलेट' या धोरणामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते
 F Reibero Writes Open Letter to IPS Officers in Country
F Reibero Writes Open Letter to IPS Officers in Country

मुंबई : महाराष्ट्र आणि पंजाब गाजवणारे सुपर काॅप ज्युलिओ एफ. रिबेरो सध्याच्या गुन्हेगारी घडामोडींनी अस्वस्थ झाले आहेत. केवळ चांगल्या ठिकाणच्या पदांसाठी स्वतःचे स्वातंत्र्य गमवू नका आणि पोलिस दलाची इज्जत धुळीला मिळवू नका, अशी कळकळीची विनंती रिबेरो यांनी केली आहे. 

रिबेरो यांनी 'द वायर' वृत्तसंस्थेसाठी लिहिलेल्या ब्लाॅगमध्ये पोलिस अधिकाऱ्यांना हे आवाहन केले आहे. सध्या ९१ वर्षांचे असलेले रिबेरो महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी होते. महाराष्ट्रसह, गुजरात आणि पंजाबमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले. विशेषतः पंजाबमध्ये खलिस्तानी चळवळ ऐन भरात असताना रिबेरो तिथे महासंचालक होते. त्यांनी अतिरेकी कारवाया थंड करण्यासाठी राबवलेल्या 'बुलेट फाॅर बुलेट' या धोरणामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. त्यांच्या या धोरणानेच पंजाबमधल्या अतिरेकी कारवाया त्यावेळी थंडावल्या. 

उत्तर प्रदेशात गँगस्टर विकास दुबेचे एन्काउंटर झाले. अशा सारख्या घटनांमुळे अस्वस्थ झालेल्या रिबेरोंनी सध्या सेवेत असलेल्या 'आयपीएस' अधिकाऱ्यांना खुले पत्र लिहिले आहे. 'सध्या काळ बदलला आहे. राजकीय दबावाची रीतही बददली आहे. स्वातंत्र्यानंतर देशाची धोरणे आखणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांपेक्षा आजची राजकारण्यांची जमात वेगळी आहे. त्यामुळे मी तुम्हाला सल्ला देणार नाही किंवा काही तत्वज्ञानही शिकवणार नाही,' असे रिबेरो यांनी या खुल्या पत्रात म्हटले आहे. मात्र ईमानदारी, कामाची निष्ठा, सत्य आणि न्यायासाठी सेवा कायदा व राज्यघटना यांच्याशी असलेले उत्तरदायित्व या गोष्टी कुठलाही निर्णय घेताना तुमच्या समोर हव्यात, असेही रिबेरो यांनी सुनावले आहे. 

(Edited By - Amit Golwalkar)

दहशहतवादाशी जो लढा दिला गेला ती पद्धत आता गुन्हे आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी उपयोगी ठरणारी नाही. पोलिस अधिकाऱ्यांना आणि राजकारण्यांना पैशाच्या जीवावर विकत घेऊन गुन्हेगारांच्या टोळ्या उभ्या राहिल्या आहेत. गुन्हेगार, पोलिस आणि राजकारणी यांच्यातल्या या अभद्र युतीतून हे राक्षस जन्माला आले आहेत. हे तुमच्यासह अगदी सामान्य काँन्स्टेबललाही माहित आहे, असेही रिबेरो सुनावतात. राजकारण्यांना आपण आवर घालू शकणार नाही, पण तुम्ही आपल्या हाताखालच्या लोकांना गुन्हेगारांना पाठीशी घालण्यापासून रोखून आपण या अभद्र युतीचा एक पाय निश्चित मोडू शकतो, असे रिबेरो म्हणतात. गुन्हेगारांना गुन्हे करु द्या, असे राजकारणी सांगणार नाहीत. पण ते तुम्हाला तुमच्या जागेवरुन हलवून गुन्हेगारांचा अप्रत्यक्ष मुक्तद्वार देऊ शकतील. पण किमान अशातून किमान तुमच्या हातून विकास दुबे घडणार नाहीत.

विकास दुबेच्या एन्काउंटरबाबतही रिबेरोंनी या खुल्या पत्रात नाराजी व्यक्त केली आहे. सध्या देशात तपास यंत्रणाच न्यायदानाचे काम करत आहेत, हे योग्य नाही, असे रिबेरोंनी स्पष्ट केले आहे. भारतात पोलिस राज असण्याची गरज तुम्हाला वाटते आहे का, असा सवालही रिबेरोंनी विचारला आहे. तामीळनाडूतील तुतीकोरीन येथे वडील व मुलाचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. त्यावरही रिबेरो यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारतातल्या प्रत्येक पोलिसांची मान शरमेने खाली जावी, असे हे कृत्य असल्याचे रिबेरोंनी म्हटले आहे. खोटी एन्काऊंटर व तपासाच्या अमानुष पद्धतींचा अवलंब करण्याची वेळ येण्यापेक्षा विकास दुबे घडूच नयेत, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे रिबेरोंनी म्हटले आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com