बंगालच्या मैदानातून शिवसेनेची माघार; ममतादीदींना पाठिंबा 

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.
Shivsena not contestiong west bengal polls says MP Sanjay Raut
Shivsena not contestiong west bengal polls says MP Sanjay Raut

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना या निवडणुकीत पाठिंबा असल्याचे शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी आज जाहीर केले. शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी काम करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते. पण निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आज शिवसेनेकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. राऊत यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. शिवसेना निवडणुक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. 

पश्चिम बंगालमध्ये सध्या 'दीदी विरूध्द सर्व' अशी स्थिती आहे. ममतादीदींना सत्तेतून खेचण्यासाठी साम, दाम, दंड, भेद म्हणजे मनी, मसल्स, मिडीया या तीन 'एम'चा वापर सुरू आहे. एका महिलेविरुध्द सुरू असलेले हे प्रयत्न पाहिल्यावर तिथे निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. आमची तेथील ताकद ममतादीदींच्या पाठिशी उभी केली जाईल. तेथील कार्यकर्ते काम करतील. बंगालच्या भूमीवर आजही ममता बॅनर्जी नावाची वाघीण गर्जना करत आहे. तिच्या गर्जनेला बळ मिळावे, ही आमची भूमिका असल्याचे राऊत यांनी सांगितले.

मी कोलकताला जाणार

पश्चिम बंगालमध्ये शिवसेना निवडणुक लढविणार नाही. पण आम्हाला वाटते की, ममता बॅनर्जी सत्तेत याव्यात. मी कोलकता येथे नक्की जाईन. पण आमचे नेते प्रचारात भाग घेणार नाहीत. मात्र, तेथील शिवसेनेचे कार्यकर्ते मदत करतील. शिवसेनेने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. 50 ते 60 जागा लढाविणार होतो. तेथील कार्यकर्ते व नेतेही तयार होते, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

लवकरच उमेदवारांची घोषणा

पश्चिम बंगालमधील उमेदवारांची घोषणा विविध पक्षांकडून लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी मागील दोन-तीन दिवसांत बैठकांना जोर आला आहे. भाजपच्या बैठकाही दिल्लीत सुरू आहे. तर तृणमूल काँग्रेसनेही आज राज्यातील सर्व जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे पुढील एक-दोन दिवसांत पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com