अर्णब गोस्वामीने भाजपचे तोंड काळे केले......

मुंबई पोलिसांनी फक्त टीआरपी घोटाळय़ातील गोस्वामी टोळीचा सहभाग उघड केला नाही तर देशाचे संरक्षण तसेच राष्ट्रीय सुरक्षेबाबत या टोळीने चालवलेले खेळही उघडे केले आहेत.या गोस्वामी टोळीने राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढून भाजपचे तोंड काळे केले आहे,'' अशा थेट शब्दात शिवसेनेने 'सामना' च्या अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपच्या नेत्यांवर कोरडे ओढले आहेत.
Arnab Goswami
Arnab Goswami

मुंबई : "मुंबई पोलिसांनी फक्त टीआरपी घोटाळय़ातील गोस्वामी टोळीचा सहभाग उघड केला नाही तर देशाचे संरक्षण तसेच राष्ट्रीय सुरक्षेबाबत या टोळीने चालवलेले खेळही उघडे केले आहेत. आता ‘अर्णब’चा आणि आपला काही संबंध नसल्याचे भाजप पुढारी सांगत आहेत. या गोस्वामी टोळीने राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढून भाजपचे तोंड काळे केले आहे,'' अशा थेट शब्दात शिवसेनेने 'सामना' च्या अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपच्या नेत्यांवर कोरडे ओढले आहेत. 

मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलेल्या बनावट टीआरपी रॅकेटमध्ये रिपब्लिक भारत, फक्त मराठी, महा मूव्ही आणि बॉक्‍स सिनेमा या चार चॅनेलचा समावेश होता. त्यांनी बनावट पद्धतीने टीआरपी मिळवल्याचे समोर आले होते. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचे वादग्रस्त व्हॉट्सअॅप चॅट हे विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी उघड केले आहे. यामुळे खळबळ उडाली असून, गोस्वामींच्या अडचणीत वाढ झाली आहे.

यावरुन आता 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. ''तरुण मराठी उद्योजक अन्वय नाईक यांचा अर्णब गोस्वामी याने मानसिक छळ केला. नाईक यांनी गोस्वामीचा स्टुडिओ उभारून दिला, त्याचे पैसे अर्णबने बुडविले. त्या मानसिक तणावाखाली नाईक यांनी आत्महत्या केली. हे सर्व प्रकरण त्यावेळच्या भाजप सरकारने दाबले, पण ‘ठाकरे सरकार’ने नाईक कुटुंबाच्या मागणीवरून या आत्महत्या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडली आणि गोस्वामी महाशयांना बेड्या पडल्या. गोस्वामीची अटक म्हणजे महाराष्ट्रात आणीबाणीच लागू झाल्याची प्रतिक्रिया तेव्हा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली होती, पण आता अर्णब गोस्वामी याचे जे ‘व्हॉट्सऍप चॅट’ उघड झाले आहे, त्यानुसार गोस्वामी याने केंद्रीय मंत्री जावडेकर यांचा उल्लेख ‘यूसलेस’ म्हणत निष्क्रिय, बिनकामाचे म्हणून केला आहे. जावडेकरांच्या जागी स्मृती इराणीस आणता येईल काय, याबाबत त्यांनी ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्तांशी चर्चा केली आहे. म्हणजे केंद्रात कोणी काय काम करायचे हे मोदी किंवा शहा (एनएम आणि एएस) ठरवत नाहीत, तर हे गोस्वामी महाशय ठरवत होते,''असा हल्ला या अग्रलेखातून करण्यात आला आहे. 

संरक्षण खात्यातील गुपिते चोरणाऱयांना देशद्रोही ठरवून त्यांचे कोर्टमार्शल केले जाते. गोस्वामी टोळीने संरक्षण खात्यातील गुपिते चोरून चव्हाटय़ावर आणली हा देशद्रोहच आहे व देशद्रोह्यांवर कारवाई करणे म्हणजे आणीबाणी आहे, असे भाजपसारख्या संघवादी लोकांना वाटत असेल तर त्यांच्या राष्ट्रवादाची व्याख्या तपासून पाहावी लागेल. लष्कराची गुपिते उघड केल्याच्या आरोपाखाली केंद्र सरकार या माणसाला तुरुंगात पाठविणार आहे काय?,'' असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.  

''अर्णब गोस्वामीचे टी.व्ही. चॅनेल भारतीय जनता पक्षाची सुपारी घेऊन विरोधकांवर तुटून पडत असे. तोंडाला उकिरड्यावरचे कुत्रे बांधावे असे ते भुंकत असे. सुशांत प्रकरण असेल नाहीतर कंगना, ईडीचा विषय असेल नाहीतर पालघरचे साधू हत्याकांड, एकतर्फी भुंकणे हाच त्याचा धंदा होऊन बसला होता.  या माणसाने पत्रकारितेचे सर्व नीतिनियम पायदळीच तुडवले. कारण त्याला ‘वर’चा आशीर्वाद होता. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. राज्यांतील नेतृत्व हिमतीचे व खमके असेल तर भाजपचे केंद्रातील नेते काहीच करू शकत नाहीत. त्यांच्या तोंडच्या वाफा काही काळ उडतात इतकेच. अनेक प्रकरणांत ते सिद्ध झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा खमकेपणा सिद्ध केलाच, पण अर्णबसारख्या भुताटकीचे खरे रूपही लोकांसमोर मराठीत एक म्हण आहे ‘केले तुका आणि झाले माका’. गोस्वामीच्या बाबतीत नेमके तेच घडले आहे,'' असाही हल्ला शिवसेनेने चढवला आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com