बिहार निवडणुकांबाबत आदित्य ठाकरेंनी घेतला 'हा' निर्णय - Shivsena to Contest fifty Seats in Bihar Assembly Elections | Politics Marathi News - Sarkarnama

बिहार निवडणुकांबाबत आदित्य ठाकरेंनी घेतला 'हा' निर्णय

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

शिवसेनेने बिहारसह उत्तर प्रदेश, गोवा राज्यातील निवडणुका लढवल्या आहेत. उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुका शिवसेनेने लढवल्या आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली होती. या भेटीत बिहारमधील निवडणुकीबाबतही चर्चा झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती.

मुंबई  : शिवसेना बिहार विधानसभेची निवडणूक लढणार आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ४५ ते ५० जागा शिवसेना लढणार आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना बिहारमध्ये भाजपची कोंडी करण्याचा विचार करत आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीच ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी सांगितले.

शिवसेनेने यापूर्वी २०१५ मध्ये बिहारला ८० विधानसभा मतदारसंघ लढवले आहेत. त्यात ३५ मतदारसंघांत शिवसेनेला भाजपपेक्षा जास्त मते होती; तर ८ मतदारसंघांत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती, असे देसाई यांनी सांगितले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना ही निवडणूक लढणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे बिहारमध्ये यापूर्वीही शिवसेनेला चांगली मते मिळाली आहेत.

शिवसेनेने बिहारसह उत्तर प्रदेश, गोवा राज्यातील निवडणुका लढवल्या आहेत. उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुका शिवसेनेने लढवल्या आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली होती. या भेटीत बिहारमधील निवडणुकीबाबतही चर्चा झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख