शरद पवार शस्त्रक्रियेसाठी बुधवारी ब्रीच कँडीमध्ये दाखल होणार - Sharad pawar will be admitted in hospital for Endoscopy and Surgery | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवार शस्त्रक्रियेसाठी बुधवारी ब्रीच कँडीमध्ये दाखल होणार

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 29 मार्च 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीच्या त्रासामुळे काल रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यांची तपासणी केल्यानंतर बुधवारी (ता. 31) त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही माहिती दिली.

मलिक यांनी ट्विटवरून दिलेल्या माहितीनुसार, पोटदुखीचा त्रास होत असल्याने पवारसाहेबांना काल रात्री अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची तपासणी केल्यानंतर एन्डोस्कोपी व शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

या समस्येमुळे सध्या त्यांना सुरू असलेली रक्त पातळ होण्याची औषधे थांबविण्यात आली आहेत. त्यांना ता. 31मार्च रोजी रुग्णालयात दाखल केले जाईल. यादिवशी एन्डोस्कोपी व शस्त्रक्रिया केली जाईल. त्यामुळे त्यांचे पुढील नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती मलिक यांनी दिली आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख