सभेचे स्टेज तोडले अन् राऊत म्हणाले, गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही..सभा होणारच!

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी महारष्ट्र एकिकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी राऊत बेळगावमध्ये दाखल झाले आहेत.
 Sanjay Raut .jpg
Sanjay Raut .jpg

बेळगाव : शिवसेनेचे खासदार संजय राऊत बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. पण बेळगाव प्रशासनाने राऊत यांच्या सभेचा धसका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. बेळगाव प्रशासनाकडून संजय राऊत यांच्या सभेच्या स्टेजची मोडतोड केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. 

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी महारष्ट्र एकिकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी राऊत बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. बेळगावात राऊतांची प्रचारसभा होणार आहे. पण, सभा होण्याआधीच बेळगाव प्रशासनाने सभेला निरोध करत व्यासपीठ आणि साऊंड सिस्टमची मोडतोड केली आहे. स्वतः संजय राऊत यांनीही या घटनेसंदर्भात ट्वीट केले आहे.

राऊत म्हणाले की ''बेळगावात उतरलोय. कर्नाटक सरकारकडून दडपशाहीला सुरूवात. संयुक्त महाराष्ट्र चौकीतील सभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बांधलेले व्यासपीठ तोडले..सभा होणारच! गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही. ही अस्मितेची लढाई झालीय'', असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे. 

बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. येत्या १७ एप्रिलला निवडणुकीचे मतदान होणार आहे. त्यामुळे बेळगावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेने या मतदारसंघातून माघार घेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळकेंना जाहीर पाठिंबा दिला आहे. बेळगाव मतदारसंघात काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ''बेळगावशी आणि महाराष्ट्र एककीकरण समितीसोबत आमचे भावनिक नाते आहे. आज त्यांना आपली गरज आहे. इथे बसून नुसते फुसके बार सोडून चालणार नाही. तिथे मैदानावर उतरुन मदत करायला हवी. माझी विरोधी पक्षाच्या किंवा सर्वच पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे, आपल्याला त्यांच्यासाठी निदान एकदिवस तरी प्रचारासाठी दिले पाहिजे. मला त्यांनी आमंत्रण दिले, मी त्यांना शंभर टक्के येणार, असे सांगितलंय. महाराष्ट्र एकीकरण समितीतच तिथे शिवसेना आहे'', असल्याचे राऊत म्हणाले होते. 

''आम्ही बेळगावात आमच्या उमेदवाराच्या प्रचाराला जाणार आहोत. तिथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न कसा उद्भवू शकतो? राज्यात जेव्हा निवडणुका होतात तेव्हा कर्नाटकचे मंत्री प्रचाराला येतात. तेव्हा कायदा-सुव्यवस्थेचा उल्लेख होत नाही? कर्नाटकाच्या नेत्यांना कोणी आडवले का, मग आम्हाला का आडवता? ते काय करतील? गोळ्या चालवतील किंवा लाठ्या चालवतील. बेळगावात भाजपचे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांना आडवले तर मी प्रचार करेल'', असेही राऊत यांनी सांगितले होते.  

 Edited By - Amol Jaybhaye  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com