सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमानने प्रथमच घेतली जाहीर भूमिका

सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अभिनेता सलमान खान याने प्रथमच भूमिका जाहीर केली आहे.
salman khan requests fan to stand with sushant family and friends
salman khan requests fan to stand with sushant family and friends

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर बॉलिवूडमध्ये मोठे वादळ उठले आहे. बॉलिवूडमध्ये कुटुंबातील अथवा जवळच्या व्यक्तींनाच संधी दिली जाते, असा आरोप करण्यात आला होता. याचबरोबर बिहारमधील न्यायालयात सलमान खानसह आठ जणांवर फौजदारी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता सलमानने प्रथमच जाहीर भूमिका घेतली असून, आपल्या चाहत्यांनी सुशांतचे कुटुंबीय आणि त्याच्या  चाहत्यांसमवेत या दु:खाच्या प्रसंगी उभे राहावे, असे आवाहन केले आहे. 

सलमानने ट्विटरवर म्हटले आहे की, सुशांतचे चाहते सध्या ज्या परिस्थितीतून जात आहेत, त्या भावना माझ्या चाहत्यांनी समजावून घ्याव्यात. मी माझ्या सर्व चाहत्यांना विनंती करतो की, त्यांना या कठीण काळात सुशांतच्या चाहत्यांसमवेत उभे राहावे. त्यांना शिवीगाळ करू नये आणि अर्वाच्च भाषा वापरू नये. जवळच्या व्यक्तीचे जाणे नेहमीच दु:खदायी असते. त्यामुळे सुशांतचे कुटुंबीय आणि चाहत्यांच्या पाठीशी माझ्या चाहत्यांनी उभे राहावे. 

सुशांतसारख्या गुणी अभिनेत्याच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्याच्या निधनाबद्दल बॉलिवूडसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. तो केवळ 34 वर्षांचा होता. त्याने अभिनयाबद्दल अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले होते. सुशांत याने हिंदी मालिकांमधून अभिनय कारकीर्द सुरू केली. त्याने सुरुवातीला 'किस देश मे है मेरा दिल' ही मालिका केली होती. मात्र, एकता कपूर यांच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेने त्याला घराघरात पोचवले. 

त्याने 'काय पो चे' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्याने स्वत:चे नायक म्हणून स्थान हिंदी चित्रपटसृष्टीत निर्माण केले होते. 'शुद्ध देसी रोमांस' या चित्रपटात तो वाणी कपूर आणि परिणिती चोप्रा यांच्यासोबत दिसला होता. भारतीय क्रिकेटसंघाचा माजी कप्तान महेंद्रसिंह धोनी याच्यावरील एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात त्याने धोनीच्या भूमिका साकारली होती. या भूमिकेचे प्रेक्षकांसह समीक्षकांनी कौतुक केले होते. तसेच, आमीर खानसोबत पीके चित्रपटातील त्याची भूमिकाही नावाजली गेली होती. त्याच्या मागील काही दिवसांपूर्वी आलेला 'छिछोरे' हा चित्रपट खूप लोकप्रिय ठरला होता. याचबरोबर 'केदारनाथ' या चित्रपटात तो सारा अली खान हिच्यासोबत दिसला होता. 

सुशांत याची माजी व्यवस्थापिका दिशा सॅलियन हिने 8 जूनला आत्महत्या केली होती. ती ऐश्वर्या रॉय, भारती सिंह आणि वरुण शर्मा या सेलेब्रिटींचा व्यवस्थापिका होती. आता सुशांत याने आत्महत्या केल्याने याचा संबंध दिशा हिच्या आत्महत्येशी आहे का, हे पोलिस पडताळून पाहत आहेत. दिशा हिच्या मृत्यूनंतर सुशांत याने सोशल मीडियावर म्हटले होते की, ही अतिशय दु:खद बातमी आहे. मी दिशा आणि तिच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. ईश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com