परमबीर सिंग खुनशी अन् भ्रष्टाचारी! पोलिस निरीक्षक घाडगे सर्वोच्च न्यायालयात

परमबीरसिंग यांच्यावर अकोल्यातॲट्रॉसिटीसह विविध 22 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Police Inspector Bhimraj Ghadge files intervention petition in supreme court against parambir singh
Police Inspector Bhimraj Ghadge files intervention petition in supreme court against parambir singh

नवी दिल्ली : महाराष्ट्रात आपल्या विरोधात विविध प्रकरणांत सुरू असलेली चौकशी अन्य राज्यांतील यंत्रणांमार्फत कऱण्यासाठी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेविरोधात आता पोलिस निरीक्षक भीमराज घाडगे हेही सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. महाराष्ट्रातच त्यांची चौकशी व्हावी, अशी हस्तक्षेप याचिका (Intervention Petition) त्यांनी न्यायालयात दाखल केली आहे. परमबीर सिंग यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला. तसेच पोलिस दलाची बदनामी केली. खोटे गुन्हे दाखल करून अडकवले, असे आरोपही घाडगे यांनी याचिकेत केले आहेत. (Police Inspector Bhimraj Ghadge files intervention petition in supreme court against parambir singh)

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या लेटरबॉम्ब टाकून खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व पोलिस महासंचालक (होमगार्ड) परमबीरसिंग यांच्यासह 27 पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात रात्री उशिरा ॲट्रॉसिटीसह विविध 22 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीरसिंग यांच्यावर विविध प्रकारचे आरोप झाल्यानंतर हा त्यांच्यावर दाखल झालेला पहिला गुन्हा आहे. परमबीर सिंग यांनी देशमुखांवर 100 कोटीच्या खंडणीचाही आरोप केला आहे. या प्रकरणातही परमबीर सिंग यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. घाडगे यांच्या आरोपांची गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. 

महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध चौकशा इतर राज्यांतील यंत्रणांमार्फत कऱण्याबाबतची याचिका परमबीर सिंग यांनी न्यायालयात केली आहे. देशमुख यांच्यावरील आरोप मागे घेण्यासाठी ठाकरे सरकारकडून खोट्या प्रकरणांत अडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांच्या या याचिकेमध्ये हस्तक्षेप याचिका घाडगे यांनी दाखल केली आहे. परमबीर सिंग यांची चौकशी महाराष्ट्रात व्हावी तसेच सीबीआयकडेही हस्तांतरित करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी करताना आमचीही बाजू ऐकून घेण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

घाडगेंचे मुंबई उच्च न्यायालयातही प्रतिज्ञापत्र

परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात आपल्याविरोधातील अॅट्राॅसिटीचा गुन्हा रद्द करण्याची मागणी कऱणारी याचिका दाखल केली आहे. देशमुख यांच्याविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या याचिकेविरोधात घाडगे यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. परमबीर सिंग यांचे आरोप काल्पनिक आणि अवास्तव असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी तक्रार केली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. परमबीर सिंग यांच्या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. 


काय आहेत घाडगे यांचे आरोप?

परमबीरसिंग हे पोलीस आयुक्त,ठाणे शहर व अन्य कोणत्याही ठिकाणी नेमणुकीस असतांना त्याचे सोबत पोलिस हवालदार फ्रान्सीस डिसिल्वा मो.नं.९८६७०५९२९२ आणि पो.ना.प्रशांत पाटील मो.नं. ९८२१८६९६२५ असे दोघेजण हे गेले २० वर्षांपासुन सोबत होते. त्यांच्यासोबत दिवसरात्र खाजगी व्यवहारासाठी व बदल्यांमधील भष्टाचाराच्या रक्कमेची देवाण घेवाण करण्यासाठी व बेनामी संपत्ती खरेदी विक्री करण्यासाठी त्यांचा वापर केला जात होता. त्या दोघांनाही परमबीरसिंग यांनी बेनामी संपत्ती कोठे व कोणाच्या नावावर खरेदी केली आहे, याबाबत संपूर्ण माहिती आहे. परमबीरसिंग यांनी सिंधुदुर्ग जिल्हयात दुसऱ्याचे नावे २१ एकर जमीन खरेदी केलेली आहे.

-परमबीरसिंग हे पोलीस आयुक्त, ठाणे येथे नेमणूक होण्यापुर्वी ते पोलीस आयुक्त,परिमंडळ-३,कल्याण येथे नेमणुकीस असल्यापासुन ते प्रकाश मुथा (रा. कल्याण) यांना चांगल्या प्रकारे ओळखत असुन ते त्याचे मित्र आहेत. त्यांच्यामार्फत रिव्हाॅल्वर  लायसन्सचे कामाचे १० ते १५ लाख रूपये घेवून लायसन्स दिले जात होते. तसेच बिल्डरांची कामे त्यांच्यामार्फत होऊन त्यामध्ये करोडो रूपयांची देवाणघेवाण वा सेटलमेंट करून केली जात होती. जो पोलीस अधिकारी त्यांचे बेकायदेशीर ऐकत नसे. त्याच्याविरूद्ध खोटे गुन्हे दाखल केले जायचे किंवा त्यांची बदली हे नियत्रंण कक्ष येथे केली जात होती. (उदा.पो.नि. कदम याची बदली मानपाडा पो.स्टे ते ठाणे नियत्रंण कक्ष अशी करण्यात आली होती. तसेच माझ्याविरूध्द पाच खोटे गुन्हे नोंदविले होते.)

-परमबीरसिंग यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याकरिता एजंट राजू अय्यर यास ठेवले होते. त्यांच्याकडे बदल्यांतील भष्टाचाराच्या रकमा जमा केल्यानंतर बदल्या केल्या जात होत्या. परमबीरसिंग यांनी पोलीस अधिकाऱ्याचे बदल्या करण्याकरिता पोलीस उपायुक्त पराग मणेरे हे देखील काम करत होते.

- परमबीरसिंग यांची करोडो रुपयांची संपत्ती जमविल्याचा आरोप घाडगे यांनी केला आहे. सिंगापूरला दोन हजार कोटी तर इंडियाबुल्स मध्ये पाच हजार कोटींची गुंतवणूक आहे.

-परमबीरसिंग हे दिवाळीला भेट म्हणुन प्रत्येक झोनचे डिसीपी कडुन प्रत्येकी ४० तोळे सोन्याचे बिस्कीट, सहायक पोलिस आयुक्ताकडुन प्रत्येकी २० ते ३० तोळयाचे सोन्याचे बिस्कीट घेत होते.

- परमबीर सिंग यांनी भष्टाचार करून मिळविलेले पैसे हे बिल्डर बोमन इराणी आणि रूरूतमजी यांच्याकडे गुंतवले आहेत. कल्याण रेतीबंदर बाजारपेठ पोलीस स्टेशनचे हददीत दररोज सुमारे २५० ते ३०० डंपर वजा ट्रक वाहतूक होत होती. त्यामध्ये दररोज करोडो रूपयाची उलाढाल होत होती. त्यामध्ये पराग मणेरे हे भागीदार होते. रेती माफिया शेगप करेल हा होता. अवैध रेती व्यावसायिकावर कायदेशीर कार्यवाही केल्यास त्या पोलिस अधिकाऱ्याविरूध्द खोटे गुन्हे दाखल करून त्यास अडकविले जात होते त्यामध्ये मलाही खोटया गुन्हयात अडकविले आहे.(सदर बाबत मी दि.१७ मार्च,२०१६ रोजी लेखी तकार दिलेली आहे.) असेही पत्रात म्हटले आहे. तसेच परमबीरसिंग यांनी त्याचा मुलगा रोहन यांचे नावाने सिंगापुर येथे व्यवसाय सुरू केला असुन त्यामध्ये सुमारे रू.२०००/- करोडची गुतवणंक केली असुन त्यामध्ये सुमारे रू.५००/- करोडचे नुकसान या वर्षी झाल्याचे गोपनीयरित्या समजले आहे.

- परमबीर सिंग यांनी अॅन्टालिया रोड, मुंबई येथे रूपये ६३ करोडचा बंगला वजा प्लॅट खेरदी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुलगा रोहन याच्या लग्नानिमित्त चंडिगड, बंगलोर येथे  करोडे रूपये खर्च केले आहेत. लग्नाचे रिसेप्शन मुंबई येथे करण्यात आले होते. परमबीरसिंग हे पोलीस आयुक्त, ठाणे शहर येथे कार्यरत असतांना त्यांनी बिल्डर जग्गु खटवाणी कोपरी यांचेकडे सुमारे रू.१००/-करोडची गुंतवणूक केली आहे. तसेच बिल्डर जितु नवलाणी,मुंबई यांचेकडे सुमारे रू.१०००/-करोडची गुंतवणूक वेगवेगळया व्यवसायात केली आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com