पंतप्रधान मोदी क्रिकेट स्टेडियमच्या नावाला घेतील आक्षेप... - PM Narendra Modi will object to his name being used says priyanka chaturvedi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

पंतप्रधान मोदी क्रिकेट स्टेडियमच्या नावाला घेतील आक्षेप...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

अहमदाबाद येथील क्रिकेट स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव दिल्यानंतर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठविली आहे.

मुंबई : अहमदाबाद येथील क्रिकेट स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव दिल्यानंतर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठविली आहे. शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही या नामांतरावरून नाराजी व्यक्त केली आहे.  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाऐवजी आपले नाव दिल्याच्याबद्दल पंतप्रधान मोदी आक्षेप घेतील, असा विश्वासही चतुर्वेदी यांनी व्यक्त केला आहे. 

अहमदाबाद येथील मोटेरा क्रिकेट स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले असून, त्याला आता जगातील सर्वांत मोठे क्रिकेट स्टेडियम बनवण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काल या स्टेडियमचे उद्घाटन झाले. या स्टेडियमचे नाव आधी सरदार पटेल स्टेडियम होते. आता त्याते नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले आहे. मोदींचे नाव स्टेडियमला देण्यावरुन नेटिझन्सनी सोशल मीडियावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. 

प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विट करून नामांतरावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामध्ये त्यांनी आधी मोटेरा स्टेडियमच्या बदललेल्या स्वरूपाचे कौतुकही केले. पण या स्टेडिअमला असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव काढल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली आहे. 

हेही वाचा : सरकारचा पाठिंबा काढला अन् आमदाराच्या घरावर आयकर विभागाची धाड

दरम्यान, नामांतरावरुन जितेंद्र आव्हाड यांनी टीकास्त्र सोडलं आहे. स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरात मधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतलेहिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते, असं ट्वीट करत मोदींवर निशाणा साधला आहे.

नावे बदलण्याच्या धुंदीत भारतरत्न मिळालेल्या महापुरुषांचा अवमान भाजपकडून करण्यात येतोय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नाव बदलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. यावर नवाब मलिक यांनी भाजपावर जोरदार प्रहार केला आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख