Nawab Malik ncp .jpg
Nawab Malik ncp .jpg

मोदींना एवढा राग का यावा, मलिकांचा सवाल

वसुधैव कुटुंबकम मोदी म्हणतात, मग जगातील लोक जर बोलत असतील तर काय चूक?

मुंबई : वसुधैव कुटुंबकम मोदी म्हणतात, मग जगातील लोक जर बोलत असतील तर काय चूक? अबकी बार ट्रम्प सरकार बोलणारे मोदी यांना जग हे आपलं वाटत मग, आंतरराष्ट्रीय पातळीवरची लोक शेतकऱ्यांवर बोलली तर काय गैर आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. 

शेतकरी आंदोलना संदर्भात हाॅलिवूडची प्रसिद्ध गायिका रिहानाने टि्विट केले होते. तेव्हापासून देशात राण उठले आहे.  रिहानाच्या टि्विटवर देशातील अनेक दिग्जांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. विदेशींनी भारतात ढवळाढवळ करु नये, असा सल्ला रिहानाला दिला आहे, त्यावर मलिक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

मलिक म्हणाले, भारतातील शेतकऱ्यांची परिस्थिती आंतरराष्ट्रीय पातळीवर कळली आहे. त्यामुळे भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलीन होते, बदनामी होत आहे. मोदी साहेब स्वतः ट्विट करतात कि त्यांचा ट्विटर हँडल कोणालातरी हँडल करायला देतात, असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला. 

केंद्राला कृषी हा महत्त्वाचा विषय आहे, मॉडेल ॲक्टनुसार केलं असतं तर ही परिस्थिती आली नसती. ज्या राज्यांना पटलं असतं त्यांनी ते मान्य केलं असतं पण कायदे लादणे योग्य नाही, असेही मलिक म्हणाले. ज्या पद्धतीने सगळेच एकदम या प्रश्नावर जागे झालेले बघायला मिळतात त्यामुळे या मागचा बोलवता धनी कोण असा संशय निर्माण होत आहे.  

आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिला राज्य सरकार आणि क्रीडा मंत्री सुनिल केदार नोकरी देऊ शकत नसतील तर काहीतरी गडबड आहे, असं म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते. शिक्षकांची भरती होत नसेल तर महाराष्ट्र सरकार काय करतय? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला होता, त्यावर मलिक यांनी राज्यपालांचा समाचार घेतला. राज्यापल पद संविधानिक आहे, त्यांच्या जबाबदारी बाबत प्रोटोकॉल निश्चित केलाय, राज्यपालांना काही वाटलं तर ते त्यांच्या पद्धतीने सेक्रेटरीला सांगू शकतात, पण मर्यादेबाहेर जाऊन सार्वजनिक ठिकाणी ते टीका करतात ते योग्य नाही. 

राजभवन भाजप कार्यालय झालय का असा प्रश्न निर्माण आहे. राजपाल स्वतःसाठी भाजपचा वापर करत आहे का असा देखील प्रश्न आहे. सार्वजनिक ठिकाणी सरकार बाबत टीकाटिपणी करून पदाचे महत्त्व ते कमी करत, असल्याचे मलिक यांनी सांगितले. महाराष्ट्रातील जनतेचे काय प्रश्न आहे. हे राज्यकर्त्यांना महामहीम राज्यपालांपेक्षा जास्त माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारचे राजकीय प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही, नसल्याचे मलिक म्हणाले. 

Edited By - Amol Jaybhaye  
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com