रेमडेसिवीरचा तुटवडा अन् भाजप कार्यालयात मोफत वाटप; हे राजकारण नाही का? - Minority Minister Nawab Malik criticizes BJP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

रेमडेसिवीरचा तुटवडा अन् भाजप कार्यालयात मोफत वाटप; हे राजकारण नाही का?

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 11 एप्रिल 2021

रेमडेसिविर इंजेक्शनसाठी सर्वसामान्य नागरिकांचे देशभरात हाल होत आहेत.

मुंबई : रेमडेसिविर इंजेक्शनसाठी सर्वसामान्य नागरिकांचे देशभरात हाल होत आहेत. पुरेसा साठा नसल्याने तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे. पण दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातच रेमडेसिविरचा साठा केला जात असल्याचे समोर आल्याने विरोधकांकडून भाजपवर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीटकरुन भाजपवर निशाणा साधला आहे.

कोरोना नियंत्रणासाठी पावले उचला सोनिया गांधी यांच्या काँग्रेसशासित राज्यांना सूचना

मलिक म्हणाले, ''देशात रेमडेसिवीर या अौषधाचा तुटवडा आहे आणि सूरतमधील भाजप कार्यालयात ते मोफत वाटण्यात येत आहे. हा राजकीय तुटवडा आहे का''? असा सवाल मलिक यांनी केला आहे.

 

भाजपच्या सूरतमधील कार्यालयातून रेमडेसिविर मोफत देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. सुमारे पाच हजार इंजेक्शनचे वाटप केले जाणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी केली आहे. कार्यालयात इंजेक्शनच्या बॅाक्स, नागरिकांच्या कार्यालयाबाहेरील रांगेचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सूरतमधील भाजप कार्यालयाने हा उपक्रम हाती घेतला आहे. इंजेक्शनसाठी डॅाक्टरांची चिठ्ठी आणि कोरोना रिपोर्ट असणे आवश्यक आहे.

लशीचे राजकारण : सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात अन् सर्वांत जास्त लशी भाजपच्या राज्यांना
 

अनेक मित्रांनी ही इंजेक्शन खरेदी केली आहेत. बाजारभावाप्रमाणे त्याची खरेदी करून भाजपकडून वितरीत केली जात आहेत. आम्ही पाच हजार इंजेक्शनचे वितरण करण्याचे ठरविले आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे. यावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली आहे. सर्वसामान्य लोकांना एका इंजेक्शनसाठी तासन् तास रांगेत उभे राहावे लागत असताना भाजपला एवढी इंजेक्शन कशी मिळाली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख