The Karnataka government issued a notice to the "IAS" officer who defended the Tablighis | Sarkarnama

तबलिगींना "हिरो' म्हणणाऱ्या या "आयएएस' अधिकाऱ्याला बजावली नोटीस

सरकारनामा ब्युरो
रविवार, 3 मे 2020

केवळ दिल्लीत तीनशेपेक्षा अधिक तबलिगी हिरोनी देशासाठी सेवा करताना प्लाज्मा डोनेट केला होता मात्र, गोदी मीडिया या हिरोंकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहत नाही आणि त्यांची दखल घेत नाही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. 

पुणे :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरचा  तपास करण्याचा आदेश दिल्याने प्रसिद्धीच्या झोतात आलेले आयएएस अधिकारी मोहम्मद मोहसिन पुन्हा एकदा चर्चेत आले असून त्यांना कर्नाटक सरकारने नोटीस पाठवून जाब विचारला आहे. मीडियाला प्रश्‍न विचारणाऱ्या या अधिकाऱ्याविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

त्याचे झाले असे की, मोहसिन यांनी एक ट्‌विट केले होते. या ट्‌विटमध्ये त्यांनी मीडियाला एक प्रश्‍न विचारला होता.प्लाज्मा डोनेट करणाऱ्या तमलिगी जमातचे अभिनंदन आणि कौतुकही केले होते आणि मीडियाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. गेल्या 27 एप्रिलरोजी केलेल्या ट्‌विटमध्ये त्यांनी म्हटले होते, की कारोना रुग्णांच्या उपचारासाठी प्लाज्मा डोनेट केले होते. केवळ दिल्लीत तीनशेपेक्षा अधिक तबलिगी हिरोनी देशासाठी सेवा करताना प्लाज्मा डोनेट केला होता मात्र, गोदी मीडिया या हिरोंकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहत नाही आणि त्यांची दखल घेत नाही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. 

मोहसिन हे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी मीडियाला अशाप्रकारे प्रश्‍न करणे चुकीचे होते असे कर्नाटक सरकारचे आणि तेथील मीडियाचे म्हणणे आहे. या ट्विटची गंभीर दखल घेत कर्नाटक सरकारने त्यांना तातडीने नोटीस बजावली आहे. या नोटीशीत म्हटले आहे येत्या पाच दिवसातन आपण केलेल्या ट्विटबाबत स्पष्टीकरण द्यावे अन्यथा आपल्या विरोधात प्रशासकीय सेवेच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल. आता मोहसिन हे काय उत्तर देतात याकडे कर्नाटकाचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. 

मोहम्मद मोहसिन हे मुळचे बिहार राज्यातील आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीतदरम्यान ओडिशात कर्तव्यावर असताना त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरचा तपास करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे ते देशात चर्चेत आले होते. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर ते पुन्हा सेवेत रूजू झाले आणि त्यांची कर्नाटकात बदली करण्यात आली. 

मोहसिन हे सध्या कर्नाटक मागासवर्गीय विकास विभागाचे सचिव आहेत आणि सरकारी सेवेत आहेत. आता तबलिगीवरून त्यांनी मीडियालाच शिंगावर घेतले आहे. भाजप सरकारने त्यांना या मुद्यावरून कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. 

दरम्यान, "पीटीआय'ने या संदर्भात मोहसिन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की हो, मला नोटीस आली आहे आणि मी त्याचे उत्तर देणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख