परमबीर सिंह सर्वोच्च न्यायालयात; याचिकेवरील सुनावणीतून न्यायमूर्ती गवईंनी अंग काढले - Justice B R Gavai recuses himself from hearing the petition filed by Parambir Singh | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

परमबीर सिंह सर्वोच्च न्यायालयात; याचिकेवरील सुनावणीतून न्यायमूर्ती गवईंनी अंग काढले

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 मे 2021

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या विविध चौकशा राज्याबाहेरील यंत्रणांकडून कराव्यात, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी नव्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या विविध चौकशा राज्याबाहेरील यंत्रणांकडून कराव्यात, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती विनीत सरन आणि न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार होती. पण या सुनावणीतून न्यायमूर्ती गवई यांनी अंग काढून घेतलं आहे. आता या याचिकेवर दुसऱ्या खंडपीठासमोर सुनावणी होईल. (Justice B R Gavai recuses himself from hearing the petition filed by Parambir Singh)

परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्याविरोधात नुकत्याच करण्यात आलेल्या तीन तक्रारींप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गोपनीय चौकशी (डिसक्रीट इन्कायरी) करण्यात सुरवात केली असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे. पोलिस निरीक्षक बी.आर. घाडगे, अनुप डांगे व व्यावसायिक सोनू जालान यांनी केलेल्या तक्रारींमध्ये परमबीरसिंग यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसेच परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप केला आहे. याप्रकरणावरही परमबीर सिंग यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

हेही वाचा : मोठी बातमी : कोरोना उपचारातून 'प्लाझ्मा थेरपी'ला वगळलं

काही दिवसांपूर्वीच परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहे. पोलिस महासंचालकांनी देशमुख यांच्याविरोधातील पत्र मागे घेण्याची धमकी दिल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. हे पत्र मागे घेण्यासाठी राज्य सरकारकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच अटक न करण्याची मागणीही त्यांनी केली होती. राज्य सरकारकडूनही त्यांना अटक न करण्याची हमी न्यायालयात देण्यात आली आहे. 

उच्च न्यायालयानंतर आता परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्याविरोधात सुरू करण्यात आलेल्या चौकशा महाराष्ट्राबाहेरील यंत्रणांकडून करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती सरन व न्यायमूर्ती गवई यांच्या खंडपीठासमोर होणार होती. पण या सुनावणीतून गवई यांनी अंग काढून घेतले आहे. आता या याचिकेवर गवई यांचा समावेश नसलेल्या खंडपीठासमोर पुढील सुनावणी होणार आहे. 

पोलिस निरीक्षक बी.आर. घाडगे यांनी पोलिस महासंचालक कार्यालयाला लेखी पत्र लिहून परमबीरसिंग यांच्याविरोधात बेकायदा कृत्य व भ्रष्टाचार करून कोट्यावधी रुपये कमवल्याचा आरोप केला होता. 14 पानी या पत्राची प्रत मुख्यमंत्री, गृहमंत्री, महासंचालक कार्यालय व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांना पाठवण्यात आले होते. पत्रात घाडगे यांनी परमबीरसिंग ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना श्रीमंत व्यक्तींची नावे विविध गुन्ह्यातून काढण्यासाठी बेकायदेशिरित्या आदेश दिल्याचा आरोप केला होता. तसेच डांगेच्या तक्रारीतही भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्याशिवाय व्यावसायिक सोनू जलाननेही त्याच्या तक्रारीत जबरदस्तीने पैसे घेण्यात आल्याचे आरोप केले होते. त्याप्रकरणी आता एसीबी अधिक चौकशी करत आहे.  

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख