महाराष्ट्रही अच्छा है, गॉंव जाकर क्‍या करेंगे! 

उद्योग सुरू होण्यासाठी राज्य सरकारकडून होत असलेल्या प्रयत्नांचा परप्रांतिय कामगारांवर चांगला परिणाम होत असल्याचे दिसत आहे. कारण जे कामगार अद्याप मूळगावी गेले नाहीत, ते म्हणतात की "महाराष्ट्रही अच्छा है, गॉंव जाकर क्‍या करेंगे, कोरोना तो कभी ना कभी ठिक हो जानेवाला है, उसके लिये गांव जाकर वापस क्‍यू आऊं, यहॉं ही रहेंगे!'
 The decision of foreign workers to stay in Maharashtra
The decision of foreign workers to stay in Maharashtra

शिक्रापूर ः उद्योग सुरू होण्यासाठी राज्य सरकारकडून होत असलेल्या प्रयत्नांचा परप्रांतिय कामगारांवर चांगला परिणाम होत असल्याचे दिसत आहे. याशिवाय जे कामगार आपल्या गावी गेले आहेत, मात्र तेथील सरकारकडून मिळणाऱ्या वागणुकीचे सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून अनेकांचे गावी जाण्याबाबत मनपरिवर्तन झाल्याचे दिसून येत आहे. कारण जे कामगार अद्याप मूळगावी गेले नाहीत, ते म्हणतात की "महाराष्ट्रही अच्छा है, गॉंव जाकर क्‍या करेंगे, कोरोना तो कभी ना कभी ठिक हो जानेवाला है, उसके लिये गांव जाकर वापस क्‍यू आऊं, यहॉं ही रहेंगे!' 

दरम्यान, अनेक परप्रांतीय महाराष्ट्रावर विश्वास ठेवून इथेच राहत आहेत. त्यांच्याबरोबरीने राज्यातील तरुणांनाही सध्या रोजगाराची चांगली संधी असून या सर्वांना संघटीत करून त्यांना एका व्यासपीठावर आणत रोजगारक्षम बनविण्यासाठी समाजवादी चळवतील अनेक कार्यकर्ते पुढाकार घेऊन काम करीत असल्याचे प्रा. सुभाष वारे यांनी सांगितले. 

तिसऱ्या लॉकडाउनच्या शेवटच्या टप्प्यात राज्यातील ग्रीन झोनमधील जिल्ह्यांत उद्योगधंदे सुरू करण्याबाबत सरकार, उद्योजक आणि व्यावसायिक यांनी पुढाकार घेतला आहे. मात्र, परप्रांतीय कामगार, मजूर, कुटुंबासह गावी परतू लागल्याने ती उद्योगविश्वासाठी विचार करायला लावणारे ठरत आहे. असे चित्र अनेक ठिकाणी अनुभवायला आले. रांजणगाव (ता. शिरूर) येथील काही परप्रांतियांशी संवाद साधल्यावर त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या महाराष्ट्रीयन माणसाची मान उंचावेल अशाच आहेत. परप्रांतीय मंडळी इथेच राहतील, मोठ्या संख्येने परत येतील, अशी आशा बाळगावी अशाच होत्या.

कठीण काळ असूनही रांजणगावात एका खोलीत राहणाऱ्या राजू राजपूत या राजस्थानमधील युवकाने सांगितले की, "आम्ही सहा मित्र वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात आलो. गेल्या वर्षभरात येथे जे काही कमावले, त्यावर आमच्या गावांकडील दहा कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला. येथे राहणे सुरक्षित आहे, काम मिळेल याची हमखास शाश्वती आहे आणि जेवढे काम कराल तेवढे उत्पन्न मिळण्याची शाश्वती आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात घरून सर्वांना सारखे बोलाविले जात आहे. मात्र, आम्ही कुणीही जाणार नसून कोरोना संपला की, उलट आणखी पंधरा मित्रांना इकडे आम्ही बोलावणार आहोत.' 

सणसवाडी-शिक्रापूर परिसरातील सूरतसिंग बर्नाला, निशिकांत कुबाटा, रोहित कुटेल, श्‍याम पटेल, मेहुल रुस्तोगी आदी आसाम, बिहार तसेच उत्तर प्रदेशातील युवकांनी सांगितले की, "लॉकडाउनमध्ये शिक्रापूर-सणसवाडीतील स्थानिकांनी आमची घरच्यासारखी काळजी घेतली. शिक्रापुरात सुरेश भुजबळ व पोलिसांच्या मदतीने एक वेळचे जेवण देण्याची चांगली व्यवस्था झाली, त्यामुळे आम्ही निर्धास्त राहिलो. आमची बरीच मित्रमंडळी गावाकडे गेली. पण आम्हाला ठाऊक आहे. आमच्या राज्यात रोजगार, सुरक्षितता आणि सामाजिक संवेदनशिलता म्हणून जी स्थिती आहे, ती इतकी भयंकर आहे की, आम्हाला महाराष्ट्रासारखे सुरक्षित कुठेच वाटत नाही. लॉकडाउन उठल्यावर गेलेल्यांपेक्षा जास्त संख्येने आमचे बांधव महाराष्ट्रात परत येतील; कारण तसे फोनही आता सुरू झाले आहेत.' 


चाकण, रांजणगाव, कुरकुंभ आदी भागातील परप्रांतीयांना महाराष्ट्राबद्दल विश्वास द्यायला प्रशासन कमी पडले आहे. त्यांच्या राज्यात रोजगार नाहीत; म्हणूनच ते येथे येतात. गेल्या काही दिवसांत जे आपापल्या प्रांतात गेले, त्यांना प्रशासनाने विश्वास दिला असता तर त्यातील अनेक जण येथेच राहिले असते. सध्या जे आहेत ते महाराष्ट्रावर विश्वास व्यक्त करून कामाला लागले आहेत. महाराष्ट्रातील तरुणांनीही रोजगाराची संधी दवडू नये. रोजगार व राज्यातील बेरोजगार तरुण यांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी आम्ही सर्व समाजवादी चळवतीतील कार्यकर्ते कामाला लागलो आहोत. 
-प्रा. सुभाष वारे, 
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com