कंगना अडचणीत; न्यायालयाने बजावले अटक वॉरंट...

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा अडचणीत आली आहे.
Court issues a bailable warrant against actor Kangana Ranaut
Court issues a bailable warrant against actor Kangana Ranaut

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. जावेद अख्तर यांची मानहानी केल्या प्रकरणी कंगनाला न्यायालयाने जामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. चौकशीसाठी वारंवार बोलावूनही हजर न झाल्यामुळे हे वॉरंट बजावण्यात आले आहे. 

गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या फौजदारी मानहानी दाव्याप्रकरणी मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने कंगना राणावतला महिनाभरापूर्वी नोटीस बजावली होती. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत अख्तर यांची बदनामी केल्याचे आरोप दाव्यात करण्यात आला आहे. त्यामुळे आपली प्रतिमा मलिन झाल्याचे अख्तर यांनी म्हटले आहे.  

मुंबईतील अंधेरी महानगर दंडाधिकारी यांनी या प्रकरणी पोलिसांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी मागील महिन्यात न्यायालयात याबाबतचा अहवाल सादर केला. कंगनावर केलल्या आरोपांत तथ्य असल्याचे सांगत आणखी तपास करावा लागेल, असे पोलिसांनी म्हटल्याचे जावेद अख्तर यांचे वकील कुमार भारव्दाज यांनी न्यायालयाला सांगितले होते. 

अख्तर यांनी केलेल्या दाव्यानुसार, कंगनाने अर्णब यांना दिलेल्या मुलाखतीत अख्तर हे बाॅलिवूडमधील सुसाईड गॅंग मध्ये सहभागी होते. काहीही केले तरी ते मोकळे सुटू शकतात, असे म्हटले होते. तिच्या या आरोपांमुळे जावेद यांची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप केला आहे. यू-ट्यूबवर ही क्लिप खूप व्हायरल झाली होती, असा युक्तिवाद भारव्दाज यांनी केला.  

कंगनाची चौकशी करण्यासाठी पोलीस तिला वारंवार समन्स बजावत आहेत. परंतु, ती त्याला उत्तर देत नाही, अशी माहिती भारद्वाज यांनी न्यायालयात दिली होती. त्यांचा युक्तिवाद एेकल्यावर न्यायालयाने कंगनाला नोटीस बजावली. १ मार्चपर्यंत न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश न्यायालयाने कंगनाला दिले. पण त्यानंतरही कंगना हजर न झाल्याने न्यायालयाने जामीनमात्र वॉरंट बजावले. त्यामुळे कंगनाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान कंगनाचे वकीलांनी या वॉरंटला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 मार्च रोजी होणार आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com