अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची अफवा; एम्समध्ये उपचार सुरू - Chota rajan is still alive treatment in aiims hospital | Politics Marathi News - Sarkarnama

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची अफवा; एम्समध्ये उपचार सुरू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 मे 2021

काही दिवसांपूर्वीच छोटा राजनला कोरोनाचा संसर्ग झाल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजन याचा शुक्रवारी दिल्लीत मृत्यू झाल्याची अफवा पसरली आहे. काही दिवसांपूर्वीच छोटा राजनला कोरोनाचा संसर्ग झाल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे एम्सकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. (Chota rajan is still alive treatment in aiims hospital)
 
राजन (वय 61) याचे काही दिवसांपूर्वीच इंडोनेशियातून प्रत्यार्पण करण्यात आले आहे. त्याला बालीतून 2015 मध्ये भारतात आणले. तेव्हापासून त्याला तिहार कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्याच्या विरोधात मुंबईत दाखल असलेले सर्व खटले केंद्रीय अन्वेषण विभागाकडे  (सीबीआय) वर्ग करण्यात आले आहे. राजन याच्या विरोधात खंडणी आणि खुनाचे तब्बल 70 खटले प्रलंबित आहेत. 

हेही वाचा : आता स्टॅलिन देणार गांधी अन् नेहरूंना आदेश; तमिळनाडूत नवे सरकार

राजन याला 2018 मध्ये पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या 2011 मधील हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच हनिफ कडावाला याच्या हत्या प्रकरणातून राजन याची मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने मुक्तता केली होती. कडावाला हा 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी होता. राजन याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. 

मुळचा फलटण तालुक्यातील गिरवी गावचा छोटा राजनने मुंबईत आपले बस्तान बसवले होते. ब्लॅकने चित्रपटाची तिकीट विकण्यापासून त्याचा अंडरवर्ल्डमधील प्रवास सुरू झाला. त्यानंतर अनेक वर्ष त्याने मुंबईतील गुन्हेगारी विश्वात आपला दबदबा निर्माण केला. 

Edited By Rajanand More

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख