अंबानींच्या जिवाला धोका? : अलिशान घराजवळ आढळली जिलेटीनच्या कांड्या भरलेली कार 

मुकेश अंबानी सध्या ऍन्टीला हाऊसमध्येच आहेत.
ambani house
ambani house

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती, रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ऍन्टीलिया या घराजवळ गुरुवारी (ता. 25 फेब्रुवारी) सायंकाळी संशयित गाडी आढळून आली आहे. त्या गाडीत जिलेटीनच्या 25 कांड्याही सापडल्या आहेत. मुकेश अंबानी हे मुंबईतील या घरातच असल्याचे समजते. 

दरम्यान, मुंबई पोलिस आणि एटीसएसची टीम अंबानी यांच्या घराजवळ पोचली आहे. पोलिसांनी जिलेटीन असलेली कार अंबानी यांच्या घराजवळून दूर हटवली आहे. 

देशातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मुंबईत उच्चभ्रू वस्तीत ऍन्टीला नावाचे घर आहे. या घराच्याजवळ आज सायंकाळी एक संशयित कार आढळून आली आहे. या कारमध्ये जिलेटीनच्या 25 कांड्याही असल्याची माहिती पुढे आली आहे. जिलेटनिच्या कांड्या फॉरेन्सिक टीमला सापडल्या आहेत. मुंबई पोलिस आणि एसएसजीची टीम अंबानी यांच्या घराजवळ पोचली आहे. संबधित कार पोलिसांनी जागेवरून दूर हटवली आहे. 

मुकेश अंबानी सध्या ऍन्टीला हाऊसमध्येच आहेत. पोलिस आधिकारी अंबानी यांच्या घरी ब्रिफींग देण्यास पोचले आहेत. 
मुंबईचे सह पोलिस आयुक्त (कायदे व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच मुंबईच्या एटीएसचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी लवकरच सत्य बाहेर येईल, असा विश्वास व्यक्त केला. सापडलेली गाडी आणि अंबानी यांच्या गाडीचा क्रमांक एकच असल्याचीही माहिती पुढे येत आहे. 

अंबानी यांना केंद्र सरकारने झेड प्लस ही सुरक्षा दिली आहे. तसेच त्यांची वैयक्तिक सुरक्षाव्यवस्थादेखील काटेकोर आहे. शेतकरी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सध्या आंदोलन आहे. या आंदोलनात मुकेश अंबानी आणि अडाणी हे दोन उद्योगपती लक्ष्य करण्यात आले होते. या आंदोलनात खलिस्तानवाद्यांचा हात असल्याचा आरोप करण्यता येत होता. ही बाजूपण पोलिस तपासात पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com