बसपला शह देण्यासाठी भाजपने आमच्याशी युती करावी  

त्यासाठी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला भारतीय जनता पक्षाने सोबत घ्यावे.
BJP should form alliance with Republican Party in forthcoming Uttar Pradesh elections : Athavale
BJP should form alliance with Republican Party in forthcoming Uttar Pradesh elections : Athavale

नवी दिल्ली : पुढील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज (ता. २४ जून) रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. (BJP should form alliance with Republican Party in forthcoming Uttar Pradesh elections : Ramdas Athavale)

या भेटीत केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी उत्तर प्रदेशच्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने रिपब्लिकन पक्षाशी युती करावी, अशी मागणी जे. पी. नड्डा यांच्याकडे केली आहे. या भेटीच्या वेळी आठवले यांच्यासोबत रिपब्लिकन पक्षाचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष पवन गुप्ता आणि पक्षाचे उत्तर प्रदेश प्रभारी जवाहर उपस्थित होते. 

आठवले यांनी नड्डा यांना सांगितले की, आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश हे महत्वाचे राज्य आहे. उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाला शह द्यायचा असेल, तर भारतीय जनता पक्षाने रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन युती केली पाहिजे. उत्तर प्रदेशमध्ये रिपब्लिकन पक्षाचे संघटन चांगले आहे. उत्तर प्रदेशातील मूळ रिपब्लिकन पक्षाचा मतदार बहुजन समाज पक्षाने आपल्याकडे वळविला आहे. मात्र, आता बहुजन समाज पक्षाकडे गेलेला रिपब्लिकन पक्षाचा मतदारवर्ग पुन्हा रिपब्लिकन पक्षाला आपल्याकडे घ्यायचा आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला भारतीय जनता पक्षाने सोबत घ्यावे. 

भारतीय जनता पक्षाने रिपब्लिकन पक्षाशी उत्तर प्रदेशमध्ये युती करून बहुजन समाज पक्षाला शह द्यावा. तसेच निवडणूक होणाऱ्या अन्य राज्यांमध्येही रिपब्लिकन पक्षाचे युनिट मजबूत आहे. अन्य राज्यांमध्ये काही जागा भाजपने रिपब्लिकन पक्षाला देऊन युती करावी. रिपब्लिकन पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा सहयोगी पक्ष आहे. भाजपसोबत राष्ट्रीय पातळीवर रिपब्लिकन पक्षाची युती मजबूत आहे. मात्र, प्रदेश स्तरावर विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला जागा देऊन युती करावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com