पंतप्रधान मोदींचा बचाव करायला गेले अन् संबित पात्राच पडले उघडे...

'नेहरू-गांधी यांच्यामुळे कोरोनाच्या लढाईत भारत तग धरून आहे,' असे 'सामना'मधील अग्रलेखामध्ये म्हटलं होतं.
Bjp leader Sambit Patra troll for his tweet on CM Uddhav Thackarey
Bjp leader Sambit Patra troll for his tweet on CM Uddhav Thackarey

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात अडकतात. त्यांच्या वक्तव्यांवरून ते सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या टिकेचे धनी बनतात. नुकतेच त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटरवरून निशाणा साधला. 'नेहरू-गांधी यांच्यामुळे कोरोनाच्या लढाईत भारत तग धरून आहे,' असे 'सामना'मधील अग्रलेखामध्ये म्हटलं होतं. त्याचाच संदर्भ देत पात्रा यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले होते. पण त्यावरून नेटकऱ्यांनी पात्रा यांनाच धारेवर धरले. (Bjp leader Sambit Patra troll for his tweet on CM Uddhav Thackarey)

'सामना'च्या अग्रलेखातील नेहरू-गांधी यांच्या उल्लेखावरून भाजपच्या अनेक नेत्यांनी ठाकरे यांच्यासह शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. या अग्रलेखातून थेट मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. 'कोरोनाविरूद्धच्या लढाईत भारत तग धरून आहे तो नेहरू-गांधी यांच्यामुळे, ७० वर्षांपासून पंडित नेहरू, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांनी उभ्या केलेल्या योजना, प्रकल्प आणि आत्मविश्वासावरच,' असं अग्रलेखात नमूद केलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना पात्रा यांनी 'हे चुकून छापलं आहे का? ते खरंच असं म्हणालेत?' असं खोचक ट्विट केलं आहे. 

पात्रा यांच्या या ट्विटवरून अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याबाजूने अनेकांनी ट्विट केलं आहे. पण तुलनेने ही संख्या कमी आहे. गौरव जैन यांनी पात्रा यांची खिल्ली उडवली आहे. 'मोदी यांनी देशाला एवढं उंचीवर नेलंय की आता अॅाक्सीजन कमी पडू लागलायं' असं ट्विट जैन यांनी केलं आहे. 'भारत नेहरू-गांधींमुळे तग धरून आहे की नाही, माहीत नाही, पण भारत मोदी-शहांमुळे मरतोय हे नक्की' असं ट्विट नायक हसन यांनी केलं आहे.

कोरोनामुळं होणारे मृत्यू काँग्रेसने बनवलेल्या रुग्णालयांत होत आहे. मोदींनी बनवलेल्या शौचालयात एकही मृत्यू नाही,' असा उपरोधिक टोला धर्मेंद्र व्यास यांनी लगावला आहे. 'सध्या तुम्ही पाहत असलेल्या सर्व रुग्णालये काँग्रेसच्याच काळातील आहेत. कोट्यवधी बालकांना पोलिओ डोस सक्षमपणे देण्यात आले,' अशा अनेक प्रतिक्रिया ट्विटरवर उमटल्या आहेत.

पात्रा यांच्या बाजूनेही अनेकांना मंत मांडली आहे. काहींनी बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचे जुने व्हिडिओ पोस्ट करून शिवसेनेवर टीका केली आहे. तसेच शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी केल्यावरून अनेकांनी टोला लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com