क्वारंटाईने केलेले बिहारचे आयपीएस अधिकारी परत पाटण्याला जाणार - Bihar Police officer will return to Patna Today | Politics Marathi News - Sarkarnama

क्वारंटाईने केलेले बिहारचे आयपीएस अधिकारी परत पाटण्याला जाणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

भिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी आलेले बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी आज पाटण्याला परत जात आहेत. तिवारी यांना पाटण्याहून मुंबई आल्यानंतर मुंबई महापालिकेने क्वारंटाईन केले होते. त्यावरून बिहार पोलिस व महाराष्ट्र पोलिसांमध्ये जुंपली होती.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी आलेले बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी आज पाटण्याला परत जात आहेत. तिवारी यांना पाटण्याहून मुंबई आल्यानंतर मुंबई महापालिकेने क्वारंटाईन केले होते. त्यावरून बिहार पोलिस व महाराष्ट्र पोलिसांमध्ये जुंपली होती. 

मुंबई महापालिकेने मला टेक्स्ट मेसेज पाठवला असून मी क्वारंटाईनच्या बाहेर जाऊ शकतो असे कळवले आहे. मी लगेचच पाटण्याला रवाना होत आहे, असे विनय तिवारी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. तिवारी यांना सुशांतसिंह राजपूत प्रकरणात 'आॅनलाईन तपास' करण्याची 'परवानगी' मुंबई महापालिकेने काल दिली होती. बृहन्मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी तसे पत्र बिहारच्या पोलिस महानिरिक्षकांना पाठवले होते. मात्र तिवारी आता परत चालले आहेत. 

पाटण्याचे पोलिस अधिक्षक विनय तिवारी सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आले आहेत. या प्रकरणात बिहारमध्ये दाखल झालेल्या तक्रारीचा तपास ते करत आहेत. तिवारी मुंबईत आल्यावर लगेचच मुंबई महापालिकेने त्यांना क्वारंटाईन केले. यावरुन राजकीय वादळ सुरु झाले आहे. महाराष्ट्र विरुद्ध बिहार असे चित्र यातून निर्माण झाले आहे. या प्रकरणी विरोधी पक्षांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. तुमचा अधिकारी झूम, गुगल मिट किंवा जिओ मिट अशा माध्यमांद्वारे आपले कामकाज सुरु ठेऊ शकतात, असे महापालिकेने बिहार पोलिसांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. दरम्यान, विनय तिवारी यांना महापालिकेने क्वारंटाईन मधून सोडले नसते तर बिहार पोलिस त्यांच्या महाअधिवक्‍त्यांचे मत जाणून घेऊन न्यायालयात जाण्याच्या विचारात होते.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख