सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात भातखळकरांचा रोख कुणा मंत्र्याकडे? - Atul Bhatkhalkar Demands CBI Inquiry in Sushant Sinh Rajput Suicide Case | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात भातखळकरांचा रोख कुणा मंत्र्याकडे?

कृष्ण जोशी
शुक्रवार, 31 जुलै 2020

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात मुंबईतील एका तरुण मंत्र्याचा स्वार्थ दडला आहे व त्याचमुळे हा तपास सीबीआयकडे दिला जात नाही, अशी लोकांच्या चर्चा असल्याचेही भातखळकर यांनी दाखवून दिले आहे. वरील दावा करणारा व्हिडियो देखील त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला आहे.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवावा अशी मागणी कांदिवली (पूर्व) चे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.

या प्रकरणाच्या तपासात मुंबईतील एका तरुण मंत्र्याचा स्वार्थ दडला आहे व त्याचमुळे हा तपास सीबीआयकडे दिला जात नाही, अशी लोकांच्या चर्चा असल्याचेही भातखळकर यांनी दाखवून दिले आहे. वरील दावा करणारा व्हिडियो देखील त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला आहे.

भातखळकर यांच्या या मागणीमुळे आता मुंबईतील हा तरुण मंत्री कोण अशीही चर्चा सुरू झाली आहे. सुशांतसिंह याच्या आत्महत्येनंतर सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता उलट सुलट आरोप होत असून सिनेसृष्टीतील संबंधित अनेकांची पोलिसांनी चौकशी केली आहे. या प्रकाराचा तपास मुंबई पोलीस व्यवस्थित प्रकारे करत नाहीत. त्यामुळे तो तपास सीबीआयकडे सोपवावा अशी भातखळकर यांची मागणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनीही अशीच मागणी केल्याचेही भातखळकर यांनी दाखवून दिले आहे. 

यासंदर्भातील पोलिस तपासावर मुंबईतील एका तरुण मंत्र्याचा दबाव आहे, अशी लोकांच्यात चर्चा असून सुशांतसिंह याच्या बहिणीनेही  असाच आरोप केला आहे. या सर्व बाबी पाहता याप्रकरणी सीबीआय चौकशी करणे आवश्यक आहे, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख