महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल सीबीआयचे नवे प्रमुख - Appointment of Subodh Kumar Jaiswal as Director of CBI | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल सीबीआयचे नवे प्रमुख

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 मे 2021

मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) संचालकपदी (Director) महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जयस्वाल यांची ही नियुक्ती दोन वर्षांसाठी असणार आहे. (Appointment of Subodh Kumar Jaiswal as Director of CBI)

जयस्वाल हे १९८५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सध्या ते प्रतिनियुक्तीवर केंद्रीय सेवेत गेले हेाते. सीबीआयच्या संचालकपदासाठी तीन नावे आघाडीवर होती. त्यापैकी सुबोधकुमार जयस्वाल यांची सीबीआयच्या प्रमुखपदी वर्णी लागली आहे. सीबीआयचे संचालक निवडण्यासाठी जी समिती नेमण्यात आली होती. त्यांनी जयस्वाल यांचे नाव केंद्र सरकारला सुचविले आहे. त्यानुसार केंद्र सरकारने जयस्वाल यांची दोन वर्षांसाठी सीबीआयच्या प्रमुखपदी नियुक्तीस मंजुरी दिली आहे.

हेही वाचा : यामुळेच लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो; भाजप नेत्याने सांगितले कारण

दरम्यान, सीबीआयच्या प्रमुखांची निवड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ता. 24 मे रोजी बैठक झाली होती. त्या बैठकीत नियमांवर बोट ठेवत केंद्र सरकारने सुचवलेल्या दोन नावांवर सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी फुली मारली होती, त्यामुळे जयस्वाल यांचे नाव आघाडीवर आले होते. या बैठकीला निवड समितीचे सदस्य व सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधिर रंजन चौधरी हे उपस्थित होते. 

तब्बल दीड तास चालेल्या या बैठकीत या समितीने तीन जणांची प्राथमिक निवड केली. परंतु, सरन्यायाधीशांनी सहा महिन्यांच्या नियमावर बोट ठेवले. हा नियम याआधी कधीही सीबीआय संचालकांच्या निवडीवेळी उपस्थित झालेला नव्हता. सरन्यायाधीशांनी यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला दिला. एखाद्या अधिकाऱ्याची सेवा सहा महिने राहिली असेल तर पोलीस सेवेच्या प्रमुखदी त्याची नियुक्ती करु नये, असा हा निर्णय आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

निवड समितीला कायद्याचे पालन करायला हवे, असे सरन्यायाधीशांनी बजावले हेाते. याला विरोधी पक्षनेते चौधरी यांनीही पाठिंबा दिला. यामुळे तीन सदस्यीस समितीत या मुद्द्याला बहुमत मिळाले. त्यामुळे जयस्वाल, सशस्त्र सीमा दलाचे (एसएसबी) महासंचालक के. आर. चंद्रा आणि गृह मंत्रालयातील विशेष सचिव व्ही. एस. के. कौमुदी यांची नावे पुढे आली होती. या तिघांपैकी जयस्वाल यांची सेवा ज्येष्ठता असल्याने त्यांची निवड करण्यात आली आहे. 

सीबीआय संचालकपदासाठी सुमारे 109 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावावर चर्चा केली जाणार होती. परंतु, बैठकीआधी सरकारने ही यादी कमी करुन केवळ 16 नावे ठेवली होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख