अमित शहा करताहेत नितीशकुमारांचा राजकीय गेम : राष्ट्रवादीचा दावा - Amit Shah trying to finish political career of Nitish Kumar Alleges NCP Leader | Politics Marathi News - Sarkarnama

अमित शहा करताहेत नितीशकुमारांचा राजकीय गेम : राष्ट्रवादीचा दावा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

भाजप गुप्तपणे चिराग पासवान यांच्या उमेदवारांना मदत करेल आणि जनता दल युनायटेडचे उमेदवार पाडण्यासाठी छुप्या पद्धतीने काम करेल जेणेकरून बिहारचे समीकरण बदलेल अशा प्रकारची रणनीती भाजप आखण्याची शक्यता नाकारता येत नाही असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे

मुंबई :  चिराग पासवान यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून नितिशकुमार यांचा राजकीय गेम अमित शहा करत आहेत अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. 

बिहारच्या निवडणुकीत लोकजनशक्ती हा पक्ष जनता दल युनायटेड यांच्यापासून विभक्त होवून केंद्रातील आघाडी भाजपसोबत आहे असं त्यांनी जाहीर केले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, चिराग पासवान यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून नितिशकुमार यांना अडचणीत आणून सत्तेतून बेदखल करण्याचे नियोजन भाजपने केलेले आहे असा दावा महेश तपासे यांनी केला आहे. बिहारच्या निवडणुकीच्या समीकरणात नितीशकुमार हे कुठेच नसतील आणि त्यांचे खच्चीकरण करण्याची जबाबदारी बिहारचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर असल्याचेही महेश तपासे यांनी सांगितले.

भाजप गुप्तपणे चिराग पासवान यांच्या उमेदवारांना मदत करेल आणि जनता दल युनायटेडचे उमेदवार पाडण्यासाठी छुप्या पद्धतीने काम करेल जेणेकरून बिहारचे समीकरण बदलेल अशा प्रकारची रणनीती भाजप आखण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही महेश तपासे म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख