विमानाचे इंधन ट्रकच्या इंधनापेक्षा ४० टक्के स्वस्त  - Aircraft fuel is 40 percent cheaper than truck fuel | Politics Marathi News - Sarkarnama

विमानाचे इंधन ट्रकच्या इंधनापेक्षा ४० टक्के स्वस्त 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

सलग आठ दिवस झालेली इंधन दरवाढ आणि गॅसच्या किमतीत झालेली वाढ यामुळे सर्वसामान्यांचे गणित कोलमडले आहे.

पुणे : सलग आठ दिवस झालेली इंधन दरवाढ आणि गॅसच्या किमतीत झालेली वाढ यामुळे सर्वसामान्यांचे गणित कोलमडले आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सलग आठव्या दिवशी इंधन दरात वाढ केली आहे. आज देशभरात पेट्रोल ३० पैसे तर डिझेल ३५ पैशानी महागले आहे. या दरवाढीने आज मुंबईत पेट्रोलचा भाव ९५.५७ रुपेय झाला आहे. तर अनेक शहारांत पाॅवर पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या ही पुढे गेले आहेत. 

सरकारच्या वतीने पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांचा प्रभाव हा सामान्य नागरिकांवरच पडत आहे. कारण विमानांना लागणार्या इंधनावर केंद्र सरकारचे कर अत्यंत कमी आहेत आणि पेट्रोल आणि डिझेल वर लागणारा सेस तर बिलकूल नाही.

नुकत्याच जाहिर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कृषी अधिभार सुध्दा फक्त पेट्रोल व डिझेल वर लावला गेला आहे. जो विमानाच्या इंधनावर लावला गेलेला नाही. परीणामी ट्रकच्या इंधनापेक्षा विमानाचे इंधन ४० टक्के स्वस्त म्हणजे ५५ रुपये प्रतिलिटर आहे. 

काँग्रेसला चार आमदारांचा 'दे धक्का' : या राज्यातील सरकार अल्पमतात...

विकासकामांसाठी कर देण्याचा भार पैट्रोल डिझेल वापरणार्या सर्वसामान्य नागरिकांवर आणि वाहतूकदारांवरच का लावला जात आहे. विमानाने प्रवास करणारे गरीब आहेत का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

विमानाला लगणार्या इंधनाचे दर प्रतिलिटर दिल्ली ५५.७३, कोलकता ६०.१६, मुंबई ५३.५६, चेन्नई ५६.८७ असे आहेत. इंधनाच्या दरवाढीमुळे आता घाऊक महागाईचा दर ११ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर गेल्यामुळे सर्व सामान्य माणसांच्या खिशाला आणखी कात्री लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरुन शिवसेनेत दोन गट? संजय राऊत म्हणाले...
 

महाराष्ट्र सरकारचा व्हॅट विमानाच्या इंधनावर डिझेलवर लावलेल्या व्हॅट पेक्षा जास्त असूनसुद्धा दरांमध्यै ही तफावत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने किमान डिझेलवरील कर व अधिभार विमानाच्या इंधनावर लागणार्या करांच्या पातळीवर आणणे आवश्यक असल्याचे, सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी सांगितले आहे. 

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख