पंजाबमधील काँग्रेसच्या विजयानंतर उर्मिला मातोंडकर यांचे ट्विट व्हायरल...म्हणाल्या  - After the victory of the Congress in Punjab, Urmila Matondkar tweet went viral | Politics Marathi News - Sarkarnama

पंजाबमधील काँग्रेसच्या विजयानंतर उर्मिला मातोंडकर यांचे ट्विट व्हायरल...म्हणाल्या 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

पंजाबमधील महापालिका व नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला आहे. आज झालेल्या सात महापालिकांच्या मतमोजणीमध्ये भाजपला एकाही ठिकाणी खाते खोलता आले नाही.

चंदीगढ : पंजाबमधील महापालिका व नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला आहे. आज झालेल्या सात महापालिकांच्या मतमोजणीमध्ये भाजपला एकाही ठिकाणी खाते खोलता आले नाही. सातही महापालिकांवर काँग्रेसने वर्चस्व मिळविले आहे. तर भठिंडा महापालिका तब्बल ५३ वर्षांनंतर काँग्रेसच्या ताब्यात आली आहे. पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांवर शेतकरी आंदोलनाचा प्रभाव असल्याने सांगण्यात येत आहे.

दरम्यान, पंजाबमधील निकालानंतर बाॅलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांचे एक ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालावर प्रतिक्रिया देताना उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे की, ''#PunjabMunicipalElection2021 चा जनादेश स्पष्ट आहे. #FarmersMakelndia'' अशा प्रकारे मातोंडकर यांनी पंजाबमधील भाजपच्या भराभवाचा संबंध भेट थेतकरी आंदोलनाशी जोडला आहे. त्यामुळे मातोंडकर यांचे ट्विट चर्चेचा विषय ठरले आहे. 

 

दरम्यान, पंजाबमधील १०९ नगर परिषद व नगर पंचायत आणि सात महापालिकांसाठी १४ फेब्रुवारीला मतदान झाले होते. जवळपास ७१ टक्के मतदान झाले असून आज मतमोजणी सुरू आहे. त्यामध्ये काँग्रेसला सर्वच ठिकाणी आघाडी मिळताना दिसत आहे. या निवडणुकीत ९ हजार २२२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये सर्वाधिक २ हजार ८३१ उमेदवार अपक्ष असून काँग्रेसने २ हजार ३७ उमेदवार उभे केले होते. भाजपचे केवळ १ हजार ३ उमेदवार नशीब अजमावत आहेत. यावेळी भाजपने शिरोमणी अकाली दलाशी आघाडी केलेली नाही. अकाली दलाने १ हजार ५६९ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. मोहाली महापालिकेतील दोन केंद्रांवर आज पुन्हा मतदान होत आहे.  

कोरोना रोखण्यासाठी मुंबईच्या लोकमध्ये 'मार्शल्स' 

आज सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये भाजपला मोठा दणका बसला आहे. शिरोमणी अकाली दलाने आधीच साथ सोडल्याने भाजप पिछाडीवर पडली होती. शेतकरी आंदोलनाचा फटकाही भाजला बसला आहे. त्यामुळे सात महापालिकांच्या निवडणुकीत भाजपला एकही महापालिका मिळालेली नाही. सातही ठिकाणी काँग्रेसने सत्ता मिळविली आहे. मोगा, होशियारपुर, कपूरथला, अबोहर, पठाणकोट, बटाला आणि बठिंडा या महापालिकांवर काँग्रेसने झेंडा फडकावला आहे. 

बठिंडा लोकसभा मतदारसंघात शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत बादल खासदार आहेत. ही महापालिका ५३ वर्षानंतर काँग्रेसला मिळाली आहे. कृषी कायद्यांना विरोध म्हणून अकाली दलाने भाजपची साथ सोडली आहे. बठिंडा शहर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे मनप्रीत सिंह बादल आमदार असून ते राज्याचे अर्थमंत्रीही आहेत. तर अकाली दलाचे फ्रमुख सुखबीर सिंह बादल यांचे ते चुलत भाऊ आहेत. 

लाॅकडाऊन पाहिजे की, थोड्या निर्बंधासह मोकळेपणाने रहायचे जनतेने ठरवावे..
 

शेतकरी आंदोलनामध्ये पंजाब व हरियाणातील शेतकरी अधिक आहे. मागील अडीच महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. पण कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकारने अद्याप कोणताही तोडगा काढला नाही. त्यामुळे पंजाबमध्ये भाजपविषयी नाराजी आहे. त्यातच अकाली दलानेही साथ सोडल्याने भाजपला या निवडणुकीत जोरदार झटका बसणार असे बोलले जात होते. आजच्या निकालावरून हेच दिसून येत असल्याचा दावा केला जात आहे.  

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख