मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतही ‘स्वच्छता मोहीम’ - Officers in Economic Offences Wing in Mumbai Police Will be Transferred | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतही ‘स्वच्छता मोहीम’

अनिश पाटील
सोमवार, 12 एप्रिल 2021

मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या नव्या कार्यपद्धतीनुसार, आर्थिक गुन्हे शाखेत (ईओडब्ल्यू) चार वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या करण्यात येणार आहेत.

मुंबई : सचिन वाझे Sachin Waze प्रकरणानंतर मुंबई पोलिस Mumbai Police दलात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या अंतर्गत नुकतीच गुन्हे शाखेतून ६५ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. आता मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे Hemant Nagrale यांच्या नव्या कार्यपद्धतीनुसार, आर्थिक गुन्हे शाखेत (ईओडब्ल्यू) चार वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या करण्यात येणार आहेत. Officers in Economic Offences Wing in Mumbai Police Will be Transferred

कार्यतत्पर अधिकारी म्हणून ओळख असलेले सहपोलिस (ईओडब्ल्यू) आयुक्त निकेत कौशिक यांनी नुकतीच आर्थिक गुन्हे शाखेतील EOW प्रभारी अधिकाऱ्यांना लेखी आदेश पाठवून या बदलीचे संकेत दिले आहेत. त्या आदेशानुसार, ३१ मे २०२१ पर्यंत ज्या अधिकाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेत चार वर्षे पूर्ण होत आहेत, त्यांची सामान्य बदलीमध्ये (जून महिन्यातील) इतर ठिकाणी बदली होण्याची शक्यता लक्षात घेता प्रभारी अधिकाऱ्यांनी अशा अधिकाऱ्यांकडे नव्या गुन्ह्यांचा तपास सोपवू नये, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

साडेसहा कोटींहून अधिक रकमेचे आर्थिक गुन्हे, बँकिंग फसवणूक Fraud, आर्थिक गैरव्यवहारांचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेत चार वर्षांपासून काम करणारे अनेक अधिकारी आहेत. सामान्यतः तीन वर्षांपर्यंत अधिकारी एखाद्या विभागात कार्यरत राहतात; पण आर्थिक गुन्हे शाखेत सहा वर्षांहून अधिक कालावधीपासून काम करणारे काही अधिकारी कार्यरत आहेत. त्यांची सर्वांची पोलिस ठाणी आणि कमी महत्त्वाच्या ठिकाणांवर (साईड ब्रांच) बदली होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. Officers in Economic Offences Wing in Mumbai Police Will be Transferred

४५ टक्के अधिकाऱ्यांची बदली होणार ?
अशा परिस्थितीत आर्थिक गुन्हे शाखेतील ४५ टक्के अधिकाऱ्यांची बदली होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांनी हाती घेतलेल्या गुन्ह्यांची न्यायालयीन प्रक्रिया आणि इतर कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. गुन्हे शाखेत एका रात्रीत ६५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख