विनायक मेटे यांनी प्रथमच केले राज्य सरकारच्या निणर्याचे स्वागत 

एमपीएससी बोर्डाला आणि राज्य सरकारला उशिरा का होईना शहाणपण सुचलं, हे चांगलं झालं.
Vinayak Mete  first time welcomed the state government's decision
Vinayak Mete first time welcomed the state government's decision

पुणे  ः कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता राज्य सरकारने येत्या रविवारी (ता. ११ एप्रिल) होणारी राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा शुक्रवारी (ता. ९ एप्रिल) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे यांनी स्वागत केले आहे. मराठा आरक्षण, त्यावरील सुनावणी आणि त्यासाठीची पूर्व तयारी यावरून महाविकास आघाडी सरकारवर कायम टिका करणाऱ्या मेटे यांनी प्रथम राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन पद्धतीने बोलविलेल्या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची उपस्थिती होती. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. त्यात राज्य लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी होणारी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. 

तत्पूर्वी, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आज सकाळीच एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी केली होती. विद्यार्थ्यांमधून तशी मागणी पुढे आली होती. काहींना कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे त्यांना परीक्षा देता आली नसती. या सर्वांचा विचार करून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याच निर्णयाचे आमदार मेटे स्वागत केले आहे.

फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करून मेटे यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी होणारी परीक्षा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, त्याबद्दल मी सरकारचे आभार मानतो. एमपीएससी बोर्डाला आणि राज्य सरकारला उशिरा का होईना शहाणपण सुचलं, हे चांगलं झालं. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो, लाखो विद्यार्थ्यांच्या जीवितास होणारा धोका टळला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून शिवसंग्राम संघटनेने राज्य लोकसेवा आयोगाची ही परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी सातत्याने केली होती. त्याला आज यश आले आहे. जे विद्यार्थी ११ एप्रिल रोजी परीक्षा देणार होते. पण, परीक्षा पुढे ढकलण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे ज्यांना वयाच्या अटीमुळे परीक्षा देता येणार नाही, त्यांना वयाच्या अटीमध्ये सवलत द्यावी. जे विद्यार्थी ११ एप्रिलला परीक्षा असणार होते, त्या सर्वांना पुन्हा परीक्षेला बसण्याची मुभा देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. ती राज्य सरकारने मान्य करावी, अशी मागणी मेटे यांनी या वेळी बोलताना केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com