आरक्षणाप्रमाणेच शिवरायांच्या स्मारकाबाबतही सरकारच्या मनात पाप!

सत्तेवर येण्यासाठी केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव हवे.
 Vinayak Mete, Uddhav Thackeray .jpg
Vinayak Mete, Uddhav Thackeray .jpg

मुंबई : मागील दीड वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांना एक तासही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामासाठी वेळ मिळाला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर केवळ राजकारण केले जाते. ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर स्मारकाकडे दुर्लक्ष झाले. असा आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी केला. (Vinayak Mete criticizes Chief Minister Uddhav Thackeray) 
 
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कार्यालयास मेटे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, 2005 ला स्मारकाला मान्यता मिळाली. फडणवीस सरकाने स्मारकाला गती देण्याचे काम केले. ठाकरे सरकारने स्मारकाचे काम कुठे अडकले आहे, यासाठी एकही बैठक घेतलेली नाही. स्मारकाच्या कामाकडे दुर्लक्ष हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. त्यातच सामान्य प्रशासनाकडे स्मारकाचे काम आहे आणि हे खाते मुख्यमंत्री यांच्याकडे असूनही दुर्लक्ष होत आसल्याचे मेटे यांनी सांगितले. 

उद्धव ठाकरे यांना गडकिल्यांची माहिती मागविण्याची तयारी केली ही आनंदाची गोष्ट मात्र, स्मारक कामासाठी वेळ का दिला नाही, असा सवाल त्यांनी केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही स्मारकाच्या कामाकडे दुर्लक्ष केले. स्मारकासाठी कार्यालय फडणवीस सरकारने उभारले, असे त्यांनी सांगितले. मी अध्यक्ष होतो त्यावेळी नियमित काय सुरू होते. स्मारक कार्यालयात मी असतांना 112 बैठका घेतल्या, स्मारकाचा आराखडा येथेच तयार केला, असेही ते म्हणाले. 

 
सत्तेवर येण्यासाठी केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव हवे. स्मारक बांधकामाला सर्वोच्च न्यायालयाचे तोंडी स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयात प्रकरण असतांना आता सरकारने एक पत्रही न्यायालयात सादर केलेले नाही. सरकारच्या मनात मराठा समाजाच्या आरक्षणासारखेच पाप स्मारकाबाबत आले असल्याचे मेटे म्हणाले. न्यायालयात याचिका सुनावणीला कशी येईल, हे अशोक चव्हाण यांनी पाहावे. सरकारला आमची मदत हवी असेल आम्ही मदत करायला तयार असल्याचे ही ते म्हणाले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण यांना पत्र लिहून कळवले. मात्र, यावर काहीही भूमिका घेतली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन केले. याचा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राग आहे का? हे स्पष्ट करावे. स्मारकाचे काम लवकर सुरू करावे, यासाठी न्यायालयात जाण्याची तयारी आम्ही केली आहे. स्मारकाच्या कामाची, कार्यालयाची जी अवस्था या सरकारने केली आहे त्यामुळे मी या सरकारचा निषेध करतो. सरकारने मनात आणले तर न्यायालयातील प्रकरण मार्गी लागू शकते. फडणवीस सरकारने स्मारकाच्या कामाला 500 कोटींची तरतूद केली होती, असेही त्यांनी सांगितले.    
Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com