वर्षा गायकवाडांच्या वाहनाला अपघात; चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली  - Education Minister Varsha Gaikwad's vehicle hit by a pickup in Hingoli | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

वर्षा गायकवाडांच्या वाहनाला अपघात; चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 10 जुलै 2021

त्यांचे वाहन पीपल्स बँकेजवळून जात असताना मोंढ्यातून भरधाव पिकअप येत होती. 

हिंगोली : अकोला ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावर हिंगोली येथे असलेल्या पीपल्स बँकेजवळ मोंढ्यातून भरधाव येणाऱ्या पिकअप वाहनाचा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या वाहनाला शनिवारी (ता. १० जुलै) दुपारी धक्का लागला. यात कुणालाही दुखापत झाली नाही. पण, शिक्षणमंत्री गायकवाड यांच्या वाहनाच्या मागील बाजूचे किरकोळ नुकसान झाले. पोलिसांनी पिकअप चालकास ताब्यात घेतले आहे. (Education Minister Varsha Gaikwad's vehicle hit by a pickup in Hingoli)

हिंगोलीच्या पालकमंत्री तथा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ह्या दोन दिवसांच्या हिंगोली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. १० जुलै) सकाळी शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्‍घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांचा ताफा शहरातील रामलीला मैदानाची पाहणी करण्यासाठी निघाला होता. त्यांचे वाहन पीपल्स बँकेजवळून जात असताना मोंढ्यातून भरधाव पिकअप येत होती. 

हेही वाचा : आमदार बनसोडेंचे ‘टेन्शन’ घालवण्यासाठी जयंत पाटलांची पिंपरी भेट! 

यावेळी गायकवाड यांच्या ताफ्यातील स्कॉटिंग व्हॅन पुढे गेल्यानंतर पिकअप चालकाने वाहन रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून शिक्षणमंत्री गायकवाड यांच्या चालकाने वाहनाची गती वाढवली. त्यामुळे गायकवाड यांचे वाहन वेगाने पुढे गेले. मात्र, पिकअपचा या वाहनाच्या मागील बाजूस असलेल्या कोपऱ्याला धक्का लागलाच. यामध्ये वाहनाच्या पाठीमागील बाजूचा भाग थोडा घासला गेला. या घटनेनंतर पोलिसांनी पिकअप चालकास ताब्यात घेऊन हिंगोली शहर पोलिस ठाण्यात नेले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख