मनमिळाऊ आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने देगलूर गहिवरले

रावसाहेब अंतापूरकर यांची आमदारकीची ही दुसरी टर्म होती.
Congress MLA Raosaheb Antapurkar passes away
Congress MLA Raosaheb Antapurkar passes away

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार रावसाहेब जयवंतराव अंतापूरकर (वय ६३) यांचे मुंबईत शुक्रवारी (ता. ९ एप्रिल) रात्री साडेअकराच्या सुमारास कोरोनामुळे निधन झाले. अंतापूरकर यांच्या मागे आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला त्यांच्यावर नांदेडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या आठ दिवसांपासून ते अत्यावस्थ होते. अखेर शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. आमदार अंतापूरकर यांचे मूळगाव असलेल्या अंतापूर (ता. देगलूर) येथे त्यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.

रावसाहेब अंतापूरकर यांची आमदारकीची ही दुसरी टर्म होती. अत्यंत मनमिळाऊ, मितभाषी आणि सरळ साधा माणूस म्हणून त्यांची अंतापूरकर यांची ओळख होती. इलेक्ट्रिक अभियंता असलेले अंतापूरकर यांनी नोकरीचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढविली होती. पहिल्याच प्रयत्नात ते विजयी झाले होते. दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत अंतापूरकर पराभूत झाले होते. मात्र, काँग्रेस पक्षाने त्यांना २०१९ च्या निवडणुकीत तिकीट दिले आणि अंतापूरकर हे प्रचंड मतांनी विजयी झाले होते. मात्र, अंतापूरकर यांचे अकाली निधन झाले. त्यांचे हे अकाली निधन अनेकांच्या मनाला चटका लावून जाणारे ठरले आहे.

माझे निकटचे सहकारी आणि देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई येथे निधन झाले. आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्याला श्रद्धांजली वाहिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com