वाढदिवसाच्या फ्लेक्सवरून भाजप नेते गायब....त्यात पंकजा मुंडेंचा काय दोष..? - BJP leader disappears from Pankaja Munde's birthday flex. Sudhir Mungantiwar says | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपचे किरीट सोमय्या अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना
चरणजीत चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री राज्याचे प्रभारी हरीश रावत यांची घोषणा
गणेशोत्सव विसर्जनामुळे पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद
अंबिका सोनी यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद नाकारले
पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत

वाढदिवसाच्या फ्लेक्सवरून भाजप नेते गायब....त्यात पंकजा मुंडेंचा काय दोष..?

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 26 जुलै 2021

इतर नेत्यांच्याबद्दल कुठे तरी कटुता असेल.

मुंबई : पंकजा मुंडे यांचे ज्या कार्यकर्त्यांनी फ्लेक्सबोर्ड लावले, त्यांच्या मनात पंकजा यांच्याविषयी जे प्रेम आहे. ते प्रेम व्यक्त करत असताना इतर नेत्यांच्याबद्दल कुठे तरी कटुता असेल म्हणून त्यांनी बोर्ड, फ्लेक्सवर फोटो छापले नसतील. त्यामध्ये पंकजा मुंडे यांचा काय दोष आहे. केंद्रीय नेते गायब झाले, असे म्हणणे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे, असे स्पष्टीकरण भाजप नेते, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पंकजा यांच्या वाढदिवसाच्या फ्लेक्सवरून भाजप नेते गायब होण्याच्या प्रश्नावर दिले. (BJP leader disappears from Pankaja Munde's birthday flex. Sudhir Mungantiwar says ...)

माजी मंत्री मुनगंटीवार हे मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. पंकजा यांच्या वाढदिवसाच्या फ्लेक्सवरून केंद्रीय नेते आणि भाजपचे कमळ चिन्ह गायब झाले आहे, असा प्रश्न मुनगंटीवार यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले.

हेही वाचा : पारनेरची बांधणी एकदम फीट केलीय, त्यामुळे प्रचाराला दौंडमध्ये येणार 

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, वाढदिवस देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, सुधीर मुनंगटीवार अथवा उद्धव ठाकरे यांचा असेल. त्यासंदर्भातील बॅनर, पोस्टर काय आम्ही छापतो काय. बॅनर तयार करणारा कुणीतरी एखादा कार्यकर्ता असतो. जो आनंदाने स्वखर्चाने बॅनर तयार करतो, पोस्टर लावतो. वाढदिवसाच्या संदर्भातील बोर्ड स्वतःच्या पैशाने लावणारा कोणीही मोठा नेता बनू शकत नाही. 

पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाच्या फ्लेक्सवर भाजप नेत्यांचे फोटो लावण्यात आलेले नाहीत, हा आरोप योग्य नाही. कोणताही नेता आपल्याच वाढदिवसाचे बोर्ड बनवत नाही. कार्यकर्ते बोर्ड बनवत असतात. पंकजा मुंडे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना राजीनामा मागे घ्यायला लावताना एवढं समाजावून सांगितले होते की, आता नाराज राहू नका. कदाचित अजूनही त्या कार्यकर्त्याच्या मनात असेल, त्यामुळे त्यांनी फोटो लावले नसतील, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

पंकजा मुंडे ह्या शेवटच्या श्वासापर्यंत भाजपतच राहतील आणि पुढच्या जन्मातसुद्धा त्या भाजपच्याच कार्यकर्त्या राहतील. त्याबाबत कुठेही शंका घेण्याचे कारण नाही. भारतीय जनता पक्ष वाढवताना (स्व.) गोपीनाथ मुंडे यांनी आपला जीव ओतलाय, आपले आयुष्य दिले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या पक्ष कशा सोडू शकतील. त्या पक्षाच्या मुख्य आधारांपैकी एक आधार आहेत, असा दावाही त्यांनी केला.

माझे नेते नरेंद्र मोदी, अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आहेत, असे पंकजा यांनी म्हटले होते. त्याबाबत मुनगंटीवार म्हणाले की, माझे नेते मोदी, शहा आणि राष्ट्रीय सचिव म्हणून ज्यांना मला अहवाल द्यावा लागतो, ते नड्डा, असे त्यांनी म्हटले होते. हे वाक्य देवेंद्र फडणवीसांसह आम्ही सर्वजण म्हणणार आहेत. राज्यातील नेत्यांची नावे घेतली नाहीत, याचा अर्थ आमच्यामध्ये दुरावा आहे, असे म्हणणे योग्य होणार नाही, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख