राणा म्हणाले, घरी रहा पण अंधारात रहा, ही कुठली पद्धत ! 

पालकमंत्र्यांनी कोणालाही विश्‍वासात न घेता अंजनगावला लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. ती पुन्हा वाढविण्यात आली. दुसरीकडे सरसकट वीजेचे कनेक्‍शन कापले जात आहे. यातून घरी रहा पण अंधारात रहा असा संदेश सरकार देत आहे. ही कुठली पद्धत आहे, असा सवाल आमदार जगजीतसिंह राणा यांनी केला.
Jagjitsingh Rana
Jagjitsingh Rana

मुंबई : पालकमंत्र्यांनी कोणालाही विश्‍वासात न घेता अंजनगावला लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. ती पुन्हा वाढविण्यात आली. दुसरीकडे सरसकट वीजेचे कनेक्‍शन कापले जात आहे. यातून घरी रहा पण अंधारात रहा असा संदेश सरकार देत आहे. ही कुठली पद्धत आहे, असा सवाल आमदार जगजीतसिंह राणा यांनी केला. 

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला आज सुरवात झाली. यावेळी आमदार राणा बोलत होते. ते बोलत असताना त्यांनी प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन केल्याने देशातील नागरीकांचे कोरोनापासून संरक्षण झाले, त्यासाठी अभिनंदन केले. त्यानंतर बोलताना त्यांनी राज्य शासनाकडून अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले. हे चुकीचे आहे. त्याने नागरिकांची गैरसोय झाली, असे विधान केले. त्याला सत्ताधारी बाकावरील काही सदस्यांनी आक्षेप घेतला. श्री. राणा यांच्या भाषणात विरोधाभास आहे. ते केंद्र शासनाच्या लॉकडाऊनचे कौतुक करतात आणि राज्य शासनाच्या कोरोनाविषयक उपाययोजनेवर मात्र टिका करीत आहेत. त्यांना नेमके म्हणायचे तरी काय?. हा विरोधाभास असुन राज्य शासनाविषयी योग्य भावना नाही, असे सांगितले. त्यावर पिठासीन अधिकाऱ्यांनी त्यांना शांत राहण्याच्या सुचना कराव्या लागल्या. 

ते म्हणाले, अमरावती विभागात अंजनगाव, सुरजी, आंचलगाव या विभागात पालकमंत्र्यांनी परस्पर लॉकडाऊन सुरु केला. त्याला पुन्हा 1 मार्च ते 7 मार्च अशी मुदतवाढ केली. अचानक केलेल्या या लॉकडाऊनमुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. हा निर्णय करतांना त्यांनी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, आणदार, खासदार कोणालाही विश्‍वासात गेतले नाही. यात सामन्य नागरिक भरडले गेले. अमरावती जिल्ह्यावर हे मोठे संकट आले. नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हा चुकीचा निर्णय घेताना लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेतले गेले असते तर बरे झाले असते. कोरोनाच्या उपाययोजना, उपचार, समस्यांचे निराकरण व स्थानिक प्रशासनाने घेतलेले निर्णय संशयास्पद आहे. कोरोनाच्या प्रयोगशाळेचे चाचणी अहवाल संशयास्पद आहेत. रुग्णालयाच्या सुविधा, चाचणी, इंजेक्‍शन, बेड यांसह खरेदीत जिल्हाधिकारी स्तरावर मोठा गैरव्यवहार झाला आहे. त्याची चौकशी करण्याची गरज आहे. मात्र वारंवार सरकारचे लक्ष वेधून देखील काहीही कारवाई झाली नाही. 

कोरोनामुळे शेतकरी, नागरिक संकटात आहे. मात्र सरकारने त्यावर दिलासा देण्याऐवजी सरसकट वीजेचे कनेक्‍शन तोडायचे काम सुरु केले आहे. हे शेतकरी अतिशय त्रस्त आहेत. त्यांचे कनेक्‍शन तातडीने जोडण्याची गरज आहे. सरकारने तातडीने वीज कनेक्‍शन जोडण्याचे आदेश द्यावेत. ज्यांना वीजेचे बील येते त्यात पन्नास सवलत दिली पाहिजे. शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी, आदिवासींचे शिक्षण बंद आहे. त्यासाठी त्यांना ऑनलाईन टॅब द्यावेत. पेट्रोल पंपावर प्रत्येकाला एक लिटर पेट्रोल देण्याचे आदेश काढले आहे. त्याने गर्दी वाढते आहे. व्यापर बंद आहे. कामगार कामावर जात नाही. शेतमाल बाजार समितीत जात नाही. त्यामुळे लॉकडाऊनचा फेरविचार करुन लॉकडाऊन मागे घ्यावे. कोरोनो चुकीचे आकडे बाहेर येत आहेत. त्याने या जिल्ह्याची बदनामी होत आहे. त्यामुळे वारंवार लॉकडाऊन वाढवला जाऊ नये. 
... 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com