भाजपला खिंडार, नगराध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
 Bjp corporators join Shiv Sena in Buldana district .jpg
Bjp corporators join Shiv Sena in Buldana district .jpg

बुलडाणा : जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगरपालिकेच्या भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षा सुनीता शिंदे, नगरसेविका पल्लवी वाजपे, नगरसेविका मालनबी समशेर खान पठाण यांनी गुरुवार (ता. २५ मार्च) वर्षा निवासस्थानी मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सिंदखेड राजा मतदार संघाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर उपस्थित होते.

नगराध्यक्षांच्या निवडणुका भाजपने थेट जनतेतून घेतल्या होत्या. त्यामध्ये भाजपच्या तिकिटावर देऊळगाव राजाच्या नगराध्यक्षा सुनीता शिंदे जनतेमधून निवडून आल्या होत्या. मात्र, देऊळगाव राजा नगर पालिकेमध्ये भाजपकडे बहुमत नसल्याने अखेर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 

देऊळगाव राजा नगरपालिकेमध्ये एकूण 17 सदस्य असून त्यामध्ये शिवसेना 5, काँग्रेस 4, राष्ट्रवादी काँग्रेस 4, भारतीय जनता पक्ष 4 सदस्य निवडून आले होते. परंतु सध्या भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष सुनीता शिंदे, नगरसेवक पल्लवी वाजपेयी आणि मालनबी पठाण यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे भारतीय जनता पक्षाला सिंदखेड राजा मतदारसंघात मोठे खिंडार पडले आहे. देऊळगाव राजा नगरपालिकेमध्ये भाजपचा फक्त 1 सदस्य उरला आहे. 

भाजपचे नगराध्यक्ष व नगरसेवक अनेक दिवसांपासून शिवसेनेच्या संपर्कात होते. त्यामुळे अखरे काल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधले. 

हे ही वाचा... 

जिल्हा परिषद आरक्षण सोडतीमुळे प्रस्थापितांना धक्का  

अकोला : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २३ मार्च) आरक्षण काढण्यात आले. महिला आरक्षणाने जिल्हा परिषदेतील सत्ताधारी माजी सदस्यांना फटका बसला असून दोन सभापती सुद्धा विस्थापित झाले आहे. त्यासोबतच राजकीय पक्षांच्या काही प्रमुखांवरही नवे मतदारसंघ (सर्कल/गट) शोधण्याची वेळ आली आहे.

जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या १४ जागांसाठी आरक्षणाची सोडत प्रक्रिया मंगळवारी (ता. २३ मार्च) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पार पडली. यावेळी १४ पैकी ७ जागा महिलाांसाठी राखीव करण्यात आल्या. नव्या आरक्षणामुळे काही सत्ताधारी माजी सदस्यांना फटका बसला आहे तर काही सदस्यांचे मतदारसंघ 'जैसे थे'च असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. 
Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com