कोण आहे एनआयएने अटक केलेला रियाझुद्दीन काझी? 

सचिन वाझे प्रकरणात एनआयएने मुंबई पोलिसांच्या क्राईम इंटिलिजन्स युनिटचा सहाय्यक निरिक्षक रियाज काझीला अटक केली आहे.एपीआय रियाझुद्दीन काझी हा १०२ व्या बॅचचा पोलिस अधिकारी आहे. २०१० मध्ये त्याने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली
Riyazuddin Kaze
Riyazuddin Kaze

मुंबई : सचिन वाझे Sachin Waze प्रकरणात एनआयएने मुंबई पोलिसांच्या Mumbai Police क्राईम इंटिलिजन्स युनिटचा सहाय्यक निरिक्षक रियाज काझीला अटक केली आहे. एपीआय रियाझुद्दीन काझी हा १०२ व्या बॅचचा पोलिस अधिकारी आहे. २०१०  मध्ये त्याने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. प्रशिक्षणानंतर त्याचे प्रथम पोस्टिंग वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये पीएसआयच्या पोस्टवर झाले. जेथे त्याने प्रोबेशन पीरियडवर काम केले. Who in API Riyazuddin Kazi From Mumbai Police

वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये काही वर्षे काम केल्यावर त्याची अँटी चेन स्नॅचिंग स्कॉडमध्ये बदली झाली. त्यानंतर रियाझुद्दीनला सीआययूमध्ये आला. अँटोलिया घोटाळ्यात त्यांचा सहभाग असल्याचे पुढे आल्यानंतर त्याची बदली एलए ब्रँचला ला करण्यात आली 

रिजायवर पुरावे नष्ठ करणे, तसेच गुन्हा घडतोय हे माहिती असताना त्यात सहभागी होण्याच्या आरोपाखाली एनआयएने NIA अटक केली आहे.अँटिलिया बाँब प्रकरण Antilica Bomb Case व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात Mansukh HIren Murder Case पुरावे नष्ट केल्याचा रियाझ काझीवर आरोप आहे. रियाज काझी याची अनेक दिवसांपासून एनआयए कार्यालयात तासनतास चौकशी सुरु होती. रियाजसह अनेक अधिकाऱ्यांचीही एनआयए चौकशी करत आहे. Who in API Riyazuddin Kazi From Mumbai Police

रियाज काझी हा ज्या सीआययू विभागात काम करत होता, त्याचे नेतृत्व सचिन वाझे करत होता. एनआयएने या संपूर्ण कार्यालयाची झडतीही घेतली होती. सचिन वाझेला अटक झाल्यानंतर एनआयएचे अधिकारी रियाज काझीला बोलावून वारंवार त्याच्याकडे चौकशी करत होते. अखेर  त्याला अटक करण्यात आली. 
Edited By - Amit Golwalkar


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com