पोलिस खात्यात 'पोस्टिंग' वाॅर- संजय पांडेही न्यायालयात जाणार

मुंबई पोलिस आयुक्तपद रिक्त झाले त्यावेळी माझ्या नावाकडे दुर्लक्ष करण्यात आले. जेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुखपद रिकामे होते, त्यावेळीही माझ्या नावाचा विचार झाला नाही. पोलिस महासंचालक पद रिक्त झाल्यानंतरही माझी सेवाज्येष्ठता डावलली गेली, असे आक्षेप पांडे यांनी नोंदवले होते
IPS Officer Sanjay Pande
IPS Officer Sanjay Pande

मुंबई : पोलिस आयुक्त पदावरुन हटविल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यानंतर आता आणखी एक पोलिस अधिकारी न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या बदल्यांच्या सत्रात सिनिअर असूनही पोलिस महासंचालकपदी नेमणूक न झाल्याबद्दल वरिष्ठ पोलिस अधिकारी संजय पांडेही (Sanjay Pande) न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहेत. (Senior IPS Officer Sanjay Pande to go to Supreme Court Against Side Posting)

अँटेलिया बाँब प्रकरणात झालेल्या गुंतागुंतीनंतर पोलिस अधिकारी सचिन वाझेंना (Sachin Waze) अटक करण्यात आली. त्यानंतर परमबीर सिंग यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन हटवून त्यांना होमगार्डच्या प्रमुखपदी बसविण्यात आले. या बदली विरोधात परमबीर सिंग (Parambir Singh) सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यावेळी झालेल्या बदल्यांमध्ये नगराळे यांना मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नेमण्यात आले. त्यांच्याकडे पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. या आधीचे महासंचालक सुबोध जयस्वाल केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेल्याने हे पद रिक्त झाले होते. 

सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 'मुंबई पोलिसांकडून अक्षम्य चुका झाल्या,' असे वक्तव्य केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिस खात्यात फेरबदल करण्यात आले. मुंबईच्या पोलिस आयुक्तपदासाठी विवेक फणसळकर, संजय पांडे, अतुलचंद्र कुलकर्णी, रजनीश शेठ यांची नावे चर्चेत होती. अखेर या पदावर हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली. 

या बदल्यांमध्ये संजय पांडे यांना होमगार्डच्या महासंचालक पदावरून बाजूला करुन त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा कार्यभार देण्यात आला. संजय पांडे १९८६च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. महाराष्ट्रातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी संजय पांडे एक आहेत. पण या बदल्यांमध्ये 'साईड पोस्टिंग' मिळाल्याने नाराज झालेले संजय पांडे रजेवर गेले. आपल्या सेवाज्येष्ठतेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा पांडे यांनी रजेवर जाण्यापूर्वी वृत्तसंस्थेशी बोलताना आरोप केला होता. या बदल्यांमध्ये रजनीश शेठ यांच्याकडे पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. (Senior IPS Officer Sanjay Pande to go to Supreme Court Against Side Posting)

जेव्हा मुंबई पोलिस आयुक्तपद रिक्त झाले त्यावेळी माझ्या नावाकडे दुर्लक्ष करण्यात आले. जेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुखपद रिकामे होते, त्यावेळीही माझ्या नावाचा विचार झाला नाही. पोलिस महासंचालक पद रिक्त झाल्यानंतरही माझी सेवाज्येष्ठता डावलली गेली, असे आक्षेप पांडे यांनी नोंदवले होते. सरकार प्रोटोकाॅलचे पालन करत नसल्याचा आरोपही पांडे यांनी केला आहे.
Edited By - Amit Golwalkar


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com