Breaking सचिन वाझेंचे पोलिस खात्यातून निलंबन - Sachin Waje Suspended from Maharashtra Police Department | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

Breaking सचिन वाझेंचे पोलिस खात्यातून निलंबन

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 मार्च 2021

अँन्टीलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेंना NIA ने अटक केल्यानंतर आता त्यांना पोलिस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. नियमानुसार सरकारी सेवेतील अधिकारी-कर्मचारी ४८ तास पोलिस कोठडीत असल्यास त्याचे निलंबन केले जाते. त्यानुसार वाझेंना खात्यातून निलंबित करण्यात आले आहे.

मुंबई : अँन्टीलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेंना NIA ने अटक केल्यानंतर आता त्यांना पोलिस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. नियमानुसार सरकारी सेवेतील अधिकारी-कर्मचारी ४८ तास पोलिस कोठडीत असल्यास त्याचे निलंबन केले जाते. त्यानुसार वाझेंना खात्यातून निलंबित करण्यात आले आहे.

अटक केल्यानंतर त्यांना काल (ता.१४ मार्च) एनआयए न्यायालयात दुपारी हजर केले असता त्यांना न्यायालयाने २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांना निलंबित करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला.  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या "अँटिलिया' निवासस्थानासमोर स्फोटकांनी सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए)  अटक केली. तत्पूर्वी सुमारे १२ तासांहून अधिक काळ त्यांची चौकशी करण्यात आली. अशी अटक होण्याची शक्यता खुद्द वाजे यांना होतीच. त्यामुळेच त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तसेच आपल्यावरील जुन्या खटल्याची जखम दाखवत जग सोडून जाण्याचीही भाषा त्यांनी केली होती. 

स्फोटकांप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाकडून तपास सुरू होता. त्या पथकामध्ये सचिन वाझे यांचाही समावेश होता. दरम्यान, मनसुख यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याने घटनेला गंभीर वळण लागले. मनसुख यांच्या पत्नीने वाझे हेच पतीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप केला होता. स्फोटकांबाबत एनआयएने केलेल्या तपासात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाल्याने NIA ने वाझे यांना अटक केली. वाझे यांनी त्यापूर्वी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण तो फेटाळण्यात आला होता.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख