लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सर्व सामान्यांसोबत आढावा बैठका सुरु - Police Taking Meetings of Citizens in Front of Lock Down | Politics Marathi News - Sarkarnama

लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सर्व सामान्यांसोबत आढावा बैठका सुरु

सूरज सावंत
मंगळवार, 13 एप्रिल 2021

नागरिकांना विश्वासात न घेता लाॅकडाऊनचे पाऊल उचलल्यास नागरिकांमध्ये नाराजी पसरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळेच पोलिस अधिकारी, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि तळागाळातले व्यापारी, सर्वसामान्यांची आॅनलईन  आढावा बैठक घेऊन परिस्थितीचं गांभीर्य समजून त्यांच्या सूचना ऐकून घेण्यास सुरूवात केली आहे.

मुंबई : शहरात कोरोनाचं वाढतं प्रमाण लक्षात घेता, पालिका आणि प्रशासनाकडून कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. दिवसेंदिवस परिस्थिती हाताबाहेर जात आहे. वेळीच कठोर पाऊले न उचलल्यास  वेळ प्रसंगी पून्हा लाॅकडाऊन करण्याच्या मनःस्थितीत राज्य सरकार आहे.

मात्र नागरिकांना विश्वासात न घेता लाॅकडाऊनचे पाऊल उचलल्यास नागरिकांमध्ये नाराजी पसरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळेच पोलिस अधिकारी, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि तळागाळातले व्यापारी, सर्वसामान्यांची आॅनलईन  आढावा बैठक घेऊन परिस्थितीचं गांभीर्य समजून त्यांच्या सूचना ऐकून घेण्यास सुरूवात केली आहे.

मुंबई पोलिसांनी स्थानिक पातळीवर ९४ पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना  आढावा बैठक घेण्याच्यासूचना केल्या आहेत.या बैठकीत   अतिरिक्त पोलिस सह आयुक्त, पोलिस उपायुकत,  स्थानिक पोलिस ठाण्याचे अधिकारी,  अंमलदार, रिटेलर, व्यवसायिक, सामाजिक कार्यकर्ते, मेडिकल, धार्मिक नेते आणि अत्यावशक सेवेत काम करणारे अधिकारी आणि इतर ...यांना सहभागी करून घेतले जात आहेत. सोमवारी उत्तर मुंबई प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त दिलीप सावंत यांनी  झूम मिटिंग Zoom Meeting मिटिंग घेतली होती. या मिटिंग मध्ये तब्बल ९८ जण हे सहभागी झाले होते.

कोरोना काळत काय उपाय योजना करायला हवी, पोलिसाकडून काय खबरदारी घ्यायला हवी, सामान्य नागरिकांच्या काय समस्या आहेत. जर पुढे लाॅकडाऊन लावल्यास जनतेकडून कुठल्याही प्रकारे विरोध होऊ नये. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये. कायपाऊले उचलायला हवीत... याबाबत स्थानिक पोलिस ठाण्याच्या पातळीवर विविध 'व्हाँट्स अँप ग्रुप" बनवण्यात आले आहेत. हे ग्रुप बनवले आहेत.

९४ पोलिस ठाण्यांतर्गत १८८  व्हाँट्स अँप ग्रुपही बनवले.

यातील एका ग्रुपमध्ये सह पोलिस आयुक्त, अतिरिक्त सह पोलिस  आयुक्त, पोलिस उपायुकत, सहाय्यक पोलिस आयुक्त आणि  स्थानिक पोलिस ठाण्याचे अधिकारी असणार आहेत दुसऱ्या ग्रुपमध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि संबधित पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत येणाऱ्या बिटचौकी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

तर तिसरा ग्रुप हा परिसरातील बिटचौकी अंतर्गत बनवण्यात आला असून त्यात  सहाय्यक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बिट चौकी अधिकारी, परिसरातील लोक प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले अधिकारी, पालिका अधिकारी, मेडिकल सेवा पुरवणारे, रिटेलर, व्यावसायिक, धर्मगुरु, मार्केट प्रतिनीधी, व्यायाम शाळा मालक, शाळा काँलेजचे प्राध्यापक, सलून व्यावसायिक यांचा एकग्रुप बनवला आहे.

Edited BY - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख