दोन अधिकाऱ्यांच्या जबाबातून परमबीरसिंग यांच्या पत्रातली विसंगती उघड - Discrepancy of Parambir Singh Letter Through Statements of two Police Officers | Politics Marathi News - Sarkarnama

दोन अधिकाऱ्यांच्या जबाबातून परमबीरसिंग यांच्या पत्रातली विसंगती उघड

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 एप्रिल 2021

माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात ज्या दोन अधिकाऱ्यांचा उल्लेख केला होता त्या दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांनी पोलिस सहआयुक्तांकडे दिलेल्या जबाबात परमबीरसिंग यांच्या आरोपांशी विसंगत माहिती दिली आहे

मुंबई : माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग Parambir Singh यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray) यांना लिहिलेल्या पत्रात ज्या दोन अधिकाऱ्यांचा उल्लेख केला होता त्या दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांनी पोलिस सहआयुक्तांकडे दिलेल्या जबाबात परमबीरसिंग यांच्या आरोपांशी विसंगत माहिती दिली आहे. त्यामुळे परमबीरसिंग यांच्या पत्रातल्या मजकुराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. Discrepancy of Parambir Singh Letter Through Statements of two Police Officers 

परमबीरसिंग यांनी आपल्या पत्रात सहाय्यक पोलिस आयुक्त संजय पाटील यांच्या चॅटचा उल्लेख केला होता. मुंबईतल्या १७५० बार आणि रेस्टाॅरंट्सकडून प्रत्येकी तीन लाख रुपये गोळा करण्यास वाझेंना Sachin Waze तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख Anit Deshmukh यांनी सांगितल्याचा उल्लेख परमबीरसिंग यांनी केला होता. मात्र, तसे काही घडले नसल्याचे पाटील यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. उलट असा काही प्रकार मुंबईत सुरु आहे काय, अशी विचारणा देशमुख यांनी वाझेंकडे केली होती व स्वतः वाझेंनीच मला हे सांगितले होते, असे पाटील यांनी जबाबात म्हटले आहे. वाझे तपासाच्या ब्रिफिंगसाठी गृहमंत्र्यांना भेटले त्यावेळी त्यांच्यात ही चर्चा झाल्याचे पाटील यांनी नमूद केले आहे.

पाटील हे पोलिस Mumbai Police उपायुक्त (अंमलबजावणी) डाॅ. राजू भुजबळ यांच्यासह गृहमंत्र्यांना भेटले, त्यावेळी गृहमंत्र्यांनी वाझेंना पैसे गोळा करण्यात सांगितले होते, असेही परमबीरसिंग यांनी आपल्या पत्रात म्हटले होते. मात्र, राजू भुजबळ यांनीही हे नाकारले आहे. मी ४ मार्चला गृहमंत्र्यांना विधानसभेतील Legislative Assembly ताराकिंत प्रश्नाबाबत भेटलो होतो. त्यावेळी बैठक संपल्यानंतर सहाय्यक आयुक्त तिथे आले होते व त्यांच्याकडे गृहमंत्री देशमुख यांच्या स्वीय सहाय्यकांनी हाॅटेल व बारमधून पैसे मिळण्याचा प्रकार सुरु असल्याची विचारणा केली होती व पाटील यांनी त्यांना तसा प्रकार नसल्याचे सांगितले होते, असा जबाब भुजबळ यांनी दिला आहे. या दोन्ही जबाबांमुळे परमबीरसिंग यांचे पत्र व या अधिकाऱ्यांनी सहआयुक्त मिलिंद भारांबे यांना दिलेला जबाब यातली विसंगती दिसून येत आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख