ठाणे : कोल्हापुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीला राजकीय भेट म्हणणे चुकीचे असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी व्यक्त केले. तसेच ही भेट योगायोगाने झाली असल्याचेदेखील त्यांनी ठाण्यात सांगितले. (Thackeray-Fadnavis meeting is not political, it is just a coincidence: Patole)
ते शनिवारी ठाण्यात ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांसह चिपळूण, कोकण, कोल्हापूर येथे अतिवृष्टीमुळे बेघर झालेल्या पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी रवाना होणाऱ्या ट्रकला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी आले होते.
हेही वाचा..
ठाण्यातील श्रीनगर येथे किन्नर समाजातील परिवारांना मोफत अन्नधान्य वाटप, शारीरिकदृष्ट्या अपंगांना व्हीलचेअरचे वाटप, तसेच कोरोनाच्या प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी ते ठाण्यात आले होते. त्या वेळी प्रल्हाद मोदी यांच्याविषयी पटोले यांना छेडले असता, यापुढे चाय विकणारा नाही तर देश विकणारा मोदी असे म्हणावे लागणार असल्याची टीका पटोले यांनी केली.
राज्यात काँग्रेसचाच विजय होईल
जे पाप भाजपने जाणीवपूर्वक देशातील जनतेच्या विरोधात केले आहे, त्या पापाचा घडा फुटण्याची वेळ आली आहे. तसेच राज्यातील राजकारणात यापुढे ६० टक्के तरुण आणि ४० टक्के जुने लोक असतील. त्याचबरोबर महाराष्ट्रात काँग्रेसचाच विजय होईल आणि येत्या काळात ठाण्यातही बदललेले चित्र दिसेल, असा दावाही त्यांनी केला. तसेच ठाणे शहर काँग्रेस पक्ष संघटनेत काही बदल होणार असल्याचेही संकेत त्यांनी या वेळी दिले.
आबा ही चालतीबोलती विधानसभा
गणपतराव देशमुख हे सर्वच नवीन पिढीला मार्गदर्शक ठरणारे नेतृत्व होते. त्यांच्यासोबत विधानसभेत तीन वेळा काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्यापासून खूप गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. त्यांच्या निधनाने संसद व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ते चालतीबोलती विधानसभा होते, असे बोलून पटोले यांनी त्यांना पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली.
हेही वाचा...
Edited By - Murlidhar Karale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.