धक्कादायक : भाजपच्या नगरसेवकाकडून घरात घुसून नगरसेविकेचा विनयभंग 

रात्री १२.४० च्या सुमारास एका महिलेच्या घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
 BJP corporator .png
BJP corporator .png

ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील भाजपचे नगरसेवक नितीन तेलवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. महिला नगरसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. एका महिला नगरसेविकेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरूवारी (ता ४ मार्च) यासंदर्भात माहिती दिली आहे.

''मुरबाडचे नगरसेवक नितीन तेलवणे यांनी मध्यरात्री (काल रात्री) जवळपास १२ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास घरात घुसून नगरसेवक असलेल्या महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला'', अशी माहिती देशमुख यांनी दिली. याप्रकरणी तेलवणे यांच्यावर आयपीसी कलम 452 (बळजबरी घरात प्रवेश), 354 (विनयभंग), 354 अ (लैंगिक छळ) आणि 506 (धमकावणे) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

या संदर्भात देशमुख यांनी ट्विटकरत म्हणटले आहे की, ''ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड येथील भाजपचा नगरसेवक नितीन तेलवाने याने काल रात्री १२.४० च्या सुमारास एका महिलेच्या घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी आज त्याला अटक करण्यात'' आल्याची माहिती त्यांनी दिली.  

मागील अनेक दिवसापासून राज्याच्या राजकारणात एकीकडे धनंजय मुंडेंवर झालेले आरोप आणि त्यानंतर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आलेला असताना, आता घरात घुसून महिला नगरसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजपाच्या नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. नितीन तेलवणे हे मुरबाडचे भाजपचे नगरसेवक आहेत.

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com