शिवसेना - भाजपचे आमदार, खासदार आले एकाच व्यासपीठावर... 

त्यातही प्रामुख्याने भाजप आणि शिवसेनेत रंगतदार लढतीझाल्या.
Shiv Sena-BJP MLAs, MPs came on the same platform
Shiv Sena-BJP MLAs, MPs came on the same platform

भिवंडी : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये राज्य स्तरावर सध्या आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध रंगले आहे. असे असताना भिवंडीत मात्र या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर आले होते. भिवंडी पंचायत समितीतर्फे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या भिवंडी तालुक्‍यातील सर्वपक्षीय नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा सत्कार सोहळा रंगला होता. भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात कटूता विसरून शिवसेना-भाजपचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

भिवंडी तालुक्‍यातील 56 ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीने झाल्या होत्या. त्यातही प्रामुख्याने भाजप आणि शिवसेनेत रंगतदार लढती झाल्या. तालुक्‍यात भाजपने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्या, तर शिवसेनेने द्वितीय क्रमांक पटकावला. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्‍यात मोठा राजकीय संघर्ष पाहावयास मिळाला. मात्र, राजकीय कटूता विसरून ग्रामविकासाला प्राधान्य देण्यासाठी पंचायत समितीने सर्वपक्षीय सरपंच-उपसरपंचांचा सत्कार सोहळा भिवंडी शहरातील अंजुर फाटा-ताडाळी रोड येथील ओसवाल महाविद्यालय सभागृहात आयोजित केला होता. 

या प्रसंगी भाजपचे खासदार कपिल पाटील, शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे, शिवसेना तालुका प्रमुख विश्वास थळे, जिल्हा परिषद सदस्य जयवंत पाटील, देवेश पाटील, सपना भोईर, कार्यक्रमाच्या आयोजक पंचायत समिती सभापती ललित पाटील, राजेंद्र भोईर, प्रताप पाटील यांच्यासह पंचायत समिती सदस्य, सरपंच आदी उपस्थित होते. 

निवडणुका होईपर्यंत उमेदवार हा पक्षाचा असतो. सरपंच पदावर निवडून आल्यावर तो संपूर्ण गावाचा होत असतो, ही भावना जो मनात ठेवून काम करेल, तोच सरपंच आपल्या कार्यात यशस्वी होईल, त्यासाठी पक्षनिरपेक्ष काम करा, असे आवाहन खासदार कपिल पाटील यांनी केले. 

खासदार पाटील म्हणाले की गावचा विकास करीत असताना पंचायत समिती हा मुख्य दुवा ग्रामपंचयतींसाठी असल्याने सरपंच, उपसरपंच यांनी सदैव पंचायत समितीच्या माध्यमातून समन्वय साधून गावातील विकास कामे मार्गी लावली पाहिजेत. खासदार म्हणून माझा विकास कामात तुम्हाला कायम पाठिंबा राहील. प्रत्येक ग्रामपंचायत ही आदर्श करण्यासाठी सरपंच व उपसरपंचांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही शेवटी खासदार पाटील यांनी या वेळी केले. 

आपल्या गावाचा विकास करताना पक्षभेद विसरावे, असे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख विश्वास थळे यांनी केले. या वेळी विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com