मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी सचिन वाझेने लोकलने प्रवास केला...

लोकेशन ट्रेस होऊ नये; म्हणून वाझे याने हे मोबाइल कार्यालयात ठेवून एका मित्राला तो उचलण्यासाठीही सांगितले होते.
Sachin Waze had traveled local train to assassinate Mansukh Hiren
Sachin Waze had traveled local train to assassinate Mansukh Hiren

मुंबई  ः व्यापारी मनसुख हिरेन यांची हत्या करण्यासाठी सचिन वाझे याने लोकलने प्रवास केल्याचे उघड झाले आहे. लोकलच्या गर्दीत ओळख पटणं कठीण असल्याने वाझे याने मोबाईल ऑफिसमध्ये ठेवून ठाण्याला लोकलंने गेल्याचे तपासात समोर आले आहे. मुंबईच्या सीएसएमटी स्टेशनसमोरील जीपीओलगतच्या सिग्नलवरील सीसीटीव्ही यंत्रणेत तो कैद झाला आहे.

उद्योगपती मुकेश अंबनी यांच्या घराजवळील सापडलेली स्फोटकांची गाडी आणि मनसुख हिरने यांच्या मृत्यूचा तपास राष्ट्रीय तपाय यंत्रणा करीत आहे. त्यांच्या तपासात ही बाब उघड झाली आहे.

हिरेन यांची हत्या करण्यासाठी ठाण्याला जाण्यासाठी सचिन वाझे याने लोकने प्रवास केल्याचे उघड झाले आहे. लोकलच्या गर्दीत ओळख पटणं कठीण असल्याने वाझे याने मोबाईल ऑफिसमध्ये ठेवून ठाण्याला लोकलने गेल्याचे तपासात समोर आले आहे. मुंबईच्या सीएसएमटी समोरील जीपीओजवळील सिग्नलवरील सीसीटीव्ही यंत्रणेते वाझे कैद झाला आहे. 

लोकेशन ट्रेस होऊ नये; म्हणून वाझे याने हे मोबाइल कार्यालयात ठेवून एका मित्राला तो उचलण्यासाठीही सांगितले होते. जर कोणाचा फोन आल्यास साहेब कामात असल्याचा मेसेज देण्यास त्याला सांगण्यात आले होते. 

दरम्यान, सचिन वाझे हा सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर सातच्या सुमारास सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्यानंतर तो ठाणे स्थानकाबाहेर दिसला आहे. पुन्हा लोकलनेच प्रवास करून तो भायखळाला उतरून बारवर रेड करण्यासाठी गेला होता. ज्यावेळी त्याने सहकाऱ्यांसोबत त्याचा मोबाइल घेऊन आणण्यास सांगितले. ज्यामुळे ते सर्वजण एका लोकेशन एकत्र दिसतील आणि वाझे याच्यावर कुणाला संशयही येणार नाही. 

राष्ट्रीय तपास यंत्रणेने मात्र मनसुख हिरेन हत्या प्रकरणात कुणा कुणाचा सहभाग आहे. त्या दिवशी कोण कोण घटनास्थळी होत. वाझेचा रोल त्यात काय, याचा तपास  एनआयए करत आहे. हिरेन यांची हत्या ही गायमुख जवळील परिसरात केल्यानंतर त्यांचा मृतदेह हा मुंब्रा खाडी परिसरात टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू हा बुडून झाल्याचे म्हटलेले आहे. 

शवविच्छेदनाच्या या अहवालामुळे शवविच्छेदन करणारे डॉक्टरही आता रडारवर आहेत. गंभीर गुन्ह्यातील हिरेन हे संशयित व्यक्ती असताना त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग का केले नाही. शवविच्छेदनावेळी डॉक्टरांनी वाझे याची भेट का घेतली. नेमकी त्यांच्यात काय चर्चा झाली. याची माहिती NIA घेत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com