ठाण्यात अॅाक्सीजन न मिळाल्याने चौघांचा मृत्यू; नातेवाईक संतप्त - Oxygen shortage three patient died due to lack of oxygen | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

ठाण्यात अॅाक्सीजन न मिळाल्याने चौघांचा मृत्यू; नातेवाईक संतप्त

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 26 एप्रिल 2021

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने देशभरात मोठ्या प्रमाणावर अॅाक्सीजनचा तुटवडा जाणवत आहे.

ठाणे : कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने देशभरात मोठ्या प्रमाणावर अॅाक्सीजनचा तुटवडा जाणवत आहे. अॅाक्सीजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचे घटनाही अनेक ठिकाणी घडत आहेत. महाराष्ट्रातही हीच स्थिती असून सोमवारी ठाण्यातील वर्तकनगर येथील वेदांत या खासगी कोविड रुग्णालयात रुग्णांना अॅाक्सीजन मिळाला नाही. त्यामुळे चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

रुग्णालयात तीन जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, तिघांचाही अचानक अचानक मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. ऑक्सिजन नसल्यामुळे सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यामुळे रुग्णालय परिसरात गोंधळ निर्माण झाला. परिणामी, पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रुग्णालयाकडून मात्र अॅाक्सीजन अभावी मृत्यू झाला नसल्याचे म्हटले आहे. रुग्णांची प्रकृती गंभीर होती, असे रुग्णालयाकडून सांगितले जात आहे.

अॅाक्सीजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी रुग्णालयाला भेट दिली. प्रशासनाला चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या घटनेनंतर मनसेचे पदाधिकारीही रुग्णालय परिसरात जमले आहेत. त्यामुळे नातेवाईक, मनसे व भाजपच्या पदाधिकाऱ्यांची गर्दी झाली आहे. मृत रुग्णाच्या नातेवाईकांकडून बिले घेऊ नयेच, अशी मागणी डावखरे यांनी केली आहे.

दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 12 तासांत तिघांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात अॅाक्सीजनचा साठा पुरेसा आहे. अतिदक्षता विभागामध्ये 25 त 30 रुग्ण आहेत. अॅाक्सीजनचा एक टँक संपला असला तरी जंबो टँक शिल्लक आहे. त्यामुळे अॅाक्सीजन अभावी मृत्यू झाल्याची माहिती चुकीची आहे. 

महापालिका प्रशासनाकडूनही यावर खुलासा करण्यात आला आहे. रुग्णालयामध्ये 53 रुग्ण असून त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांचा मृत्यू पहाटे चार ते सकाळी नऊ या कालावधीत झाला आहे. तसेच रुग्णालयात अॅाक्सीजनचा तुटवडा नाही. त्यामुळे अॅाक्सीजन अभावी त्यांचा मृत्यू झालेला नाही, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

सहा जणांची चौकशी समिती

ठाण्यातील वेदांत या कोविड रुग्णालयातील मृत्यू प्रकरणाची चौकशी सहा जणांची समिती करणार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही दिली आहे..रुग्णालयाच्या डॉक्टरांची भेट घेतल्या नंतर आव्हाड यांनी समितीबाबत माहिती दिली.

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख