पेणचा पुढचा आमदार शिवसेनेचा असेल

संजय जांभळे यांच्या प्रवेशाने येथील शिवसेना मजबूत होणार आहे.
The next MLA of Pen will be from Shiv Sena : MLA Mahendra Dalvi
The next MLA of Pen will be from Shiv Sena : MLA Mahendra Dalvi

वडखळ (जि. रायगड)  ः रायगडमध्ये शिवसेनेचे तीन आमदार असून जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढत आहे. आगामी निवडणुकीत रायगड जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकणार, असा विश्वास शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख तथा आमदार महेंद दळवी यांनी वडखळ येथे शिवसैनिकांच्या बैठकीत व्यक्त केला. (The next MLA of Pen will be from Shiv Sena : MLA Mahendra Dalvi)

वडखळ येथे पेण तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिकांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत आमदार महेंद्र दळवी यांनी वरील विश्वास व्यक्त केला. या वेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नरेश गांवड, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय जांभळे, पेण शहर प्रमुख सुधाकर म्हात्रे, विभाग प्रमुख लवेंद्र मोकल, संतोष पाटील आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी बोरावाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. 

पेण तालुका शिवसेनेचा गड आहे. पेणची राजकीय परस्थिती बदलली पाहिजे. पेण नगरपालिका व पाली नगरपंचायतीची निवडणूक महत्वाची आहे, या निवडणुकांमध्ये युवकांना संधी दिली पाहिजे. रायगड जिल्ह्यातील अनेक नेते, कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. संजय जांभळे यांच्या प्रवेशाने येथील शिवसेना मजबूत होणार आहे. त्यामुळे यापुढे पेणचा आमदार शिवसेनेचा असेल, असा दवाही आमदार महेंद्र दळवी यांनी या वेळी बोलताना केला.

गाव तिथे शिवसेनेची शाखा, घर तिथे शिवसैनिक ही संकल्पना राबवून येथील शिवसेना मजबूत करणार आहे. पेणचा आमदार शिवसेनेचा असेल असे संजय जांभवे यांनी या वेळी सांगितले. 

संजय जांभळे यांचा शिवसेनेत प्रवेश झालेला आहे. त्यांच्या प्रवेशाने शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाले आहे. आगामी निवडणुकीत जिल्हा परिषदेवर शिवसेनेची सत्ता यायला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करूया, असेही नरेश गांवड यांनी या वेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com