खासदार दिलदार है ...लेकीन कुछ चमचो से लोग परेशान है 

राजकीय टोमणे व चिमट्यांचे होर्डिंग कल्याणध्ये झळकावन्यात आले आहेत. मात्र, यावेळचा बॅनर काही वेगळाच आहे.
In Kalyan the corporator called the MP workers spoon .jpg
In Kalyan the corporator called the MP workers spoon .jpg

कल्याण : कल्याण मध्ये होर्डिंगच्या माध्यमातून आपल्या विरोधकांना राजकीय टोमणे ,चिमटे काही नवीन नाहीत ,या आधी देखील अनेक राजकीय टोमणे व चिमट्यांचे होर्डिंग कल्याणध्ये झळकावन्यात आले आहेत. मात्र, यावेळचा बॅनर काही वेगळाच आहे. 

शिवसेनेचे कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण पूर्व नेतीवली परिसरात लावण्यात आलेला बॅनर शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. या बॅनर वर शिवसेना नगरसेवकाने खासदार श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्याच्या जवळच्या कार्यकर्त्यांना, मात्र चक्क चमचे असा उल्लेख करत " खासदार दिलदार है ...लेकीन कुछ चमचो से लोग परेशान है, असा टोमणा लगावाला आहे. 

या बॅनरमधील मजकुरामूळे शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहे. शिवसेना नगरसेवकाने खासदाराना बॅनर च्या माध्यमातून शुभेच्छा देतानाच त्यांना दिलदार ही उपमा दिली आहे. मात्र त्यांच्या जवळचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमुळे नगरसेवक नक्कीच दुखावल्याची चर्चा होत आहे. 

या बॅनरमध्ये उल्लेख केलेले "चमचे" कोण असा सवाल बॅनर पाहणाऱ्या नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. यामुळे कल्यण शहरातील शिवसेनेतील अंतर्गत कलह उघड करणारा हा बॅनर शहरातील नागरीकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.  


हे हि वाचा...

बाळासाहेब थोरात होणार उपमुख्यमंत्री?
 
मुंबई :  विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्यास रिक्त होणारे पद शिवसेनेकडे सोपवण्याची तयारी काँग्रेसने दाखविल्याचे समजते. महाविकास आघाडी सरकारमध्ये दुय्यम मानली जाणारी काँग्रेसची शक्ती प्रखर करण्यासाठी उपमुख्यमंत्रिपद आणि काही महत्त्वाची खाती आम्हाला सोपवा, असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडण्यात आल्याचे समजते.

नव्या प्रस्तावानुसार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात नवे उपमुख्यमंत्री होऊ शकतील. विधानसभा अध्यक्षांसारखे महत्त्वाचे पद मिळणार असल्याने शिवसेना या प्रस्तावाला अनुकूल असल्याचे समजते. मात्र कोणताही विशेष अधिकार नसलेले उपमुख्यमंत्रिपद स्वीकारून अध्यक्षासारख्या महत्त्वाच्या पदावर तुळशीपत्र ठेवण्यास काँग्रेसमधील काही प्रमुख नेत्यांचा विरोध आहे.

कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातही आमदारांच्या पळवा पळवीचे प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केल्यास पक्षांतरबंदीचे सर्व कायदे राबवणारे अध्यक्षपद शिवसेनेकडे स्वत:हून सोपवणे योग्य नसल्याचे काँग्रेसमधील काही ज्येष्ठांचे मत आहे. शिवसेनेने मात्र या प्रस्तावावर चर्चा करायला हरकत नाही, अशी सावध भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने अध्यक्षपद आमच्याकडे येत असेल, तर ते चांगलेच नाही का, अशी टिपणी जोडत याबद्दल तशी वेळ आल्यास महाविकास आघाडीच्या समन्वय बैठकीत चर्चा करण्याची तयारी असल्याचे सांगितले.
 
Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com