Former Mumbai mayor, former minister infected with corona | Sarkarnama

मुंबईचे माजी महापौर, माजी मंत्र्याला कोरोनाचा संसर्ग 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 मे 2020

चेंबूरच्या लोखंडे मार्ग परिसरात आतापर्यंत 200 जर करोना बाधित असल्याचे आढळून आले आहे.

मुंबई : कॉंग्रेसचे नेते, मुंबईचे माजी महापौर आणि माजी सामाजिक न्यायमंत्र्याला करोनाची लागण झाली आहे. 

  ते राहत असलेल्या चेंबूरच्या लोखंडे मार्ग परिसरात आतापर्यंत 200 जर करोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. चेंबूरमधील करोनाचे सर्वाधिक रुग्ण पी.एल. लोखंडे मार्गावर आहेत.

यामध्ये 16 जणांचा मृत्यूदेखील झाला.कोरोनाच्या संकटात परिसरात फिरून गोरगरीबांना कॉंग्रेसचे हे नेते मदत करत होते. ते स्वत: फिल्डवर काम करीत होते. आता त्यांनाच संसर्ग झाला आहे. 

जंतुनाशक फवारणी, धान्यवाटप, पालिका अधिकाऱ्यांना सूचना देणे, नागरिकांसाठी करोना तपासणी शिबीर आयोजित करणे अशा कार्यक्रमांमध्ये त्यांचा  सहभाग आहे. कॉंग्रेसच्या माध्यमातून ते जनतेची सेवा करीत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख

टॅग्स